Home /News /sport /

IND vs AUS : भारताचा पुन्हा मोठा पराभव, वनडे सीरिजही गमावली

IND vs AUS : भारताचा पुन्हा मोठा पराभव, वनडे सीरिजही गमावली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडिया (India vs Australia) चा पराभव झाला आहे. त्यामुळे भारताने तीन मॅचची वनडे सीरिज 2-0ने गमावली आहे.

    सिडनी, 29 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडिया (India vs Australia) चा पराभव झाला आहे. त्यामुळे भारताने तीन मॅचची वनडे सीरिज 2-0ने गमावली आहे. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 390 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 50 ओव्हरमध्ये 338-9 एवढा स्कोअर केला, त्यामुळे भारताला हा सामना 51 रननी गमवावा लागला. या मॅचमध्ये टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला चांगली सुरुवात मिळाली, पण कोणालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 89 रन केले, तर केएल राहुल 76 रन करून आऊट झाला. मयंक अग्रवाल 28, शिखर धवन 30, श्रेयस अय्यर 38, हार्दिक पांड्या 28 आणि रविंद्र जडेजाने 24 रन केले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 3 विकेट घेतल्या, तर हेजलवूडला आणि ऍडम झम्पाला प्रत्येकी 2, तसंच मोईसेस हेनिरक्स आणि ग्लेन मॅक्सवेलला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समननी पुन्हा एकदा भारतीय बॉलरना धुतलं. सिडनीमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये 389-4 एवढा स्कोअर केला. मागच्या मॅचमध्ये शतकी खेळी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने या मॅचमध्येही शतक केलं. स्मिथने 64 बॉलमध्ये 104 रनची खेळी केली, यामध्ये 14 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. तर डेव्हिड वॉर्नरने 83, एरॉन फिंचने 60, मार्नस लाबुशेनने 70 रन आणि ग्लेन मॅक्सवेलने 29 बॉलमध्ये नाबाद 63 रन केले. मॅक्सवेलने त्याच्या या खेळीमध्ये 4 फोर आणि 4 सिक्स लगावले. ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या सगळ्या पाच बॅट्समननी अर्धशतकापेक्षा जास्त स्कोअर केला.भारताकडून मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. पहिली वनडे मॅच 66 रनने गमावल्यानंतर सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला ही मॅच जिंकणं गरजेचं होतं. पण पराभव झाल्यामुळे सीरिज गमावण्याची नामुष्की भारतीय टीमवर ओढावली आहे. या मॅचसाठी कर्णधार विराट कोहलीने टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत, तर ऑस्ट्रेलियाने दुखापतग्रस्त मार्कस स्टॉयनिसऐवजी मॉसेस हेनरिक्स याला संधी दिली आहे. भारतीय टीम शिखर धवन, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, नवदीप सैनी, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल ऑस्ट्रेलियन टीम एरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॉसेस हेनरिक्स, ऍलेक्स कारे, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, एडम झम्पा, जॉस हेजलवूड
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या