मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS : श्रेयस अय्यरचा भन्नाट थ्रो, वॉर्नर थेट पॅव्हेलियनमध्येच गेला

IND vs AUS : श्रेयस अय्यरचा भन्नाट थ्रो, वॉर्नर थेट पॅव्हेलियनमध्येच गेला

डेव्हिड वॉर्नर (David Warner) भारतासाठी धोकादायक ठरेल असं वाटत असतानाच श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ने भन्नाट थ्रो करून वॉर्नरला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

सिडनी, 29 नोव्हेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय बॉलरनी पुन्हा एकदा निराश केलं. ऑस्ट्रेलियाचे ओपनर एरॉन फिंच (Aron Finch) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांनी लागोपाठ दुसऱ्या मॅचमध्ये शतकी पार्टनरशीप केली. पण डेव्हिड वॉर्नर भारतासाठी धोकादायक ठरेल असं वाटत असतानाच श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ने भन्नाट थ्रो करून वॉर्नरला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. अय्यरने केलेला हा थ्रो थेट स्टम्पवर जाऊन आदळला.

26व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर जडेजा बॉलिंग करत असताना स्मिथने लॉन्ग ऑफच्या दिशेने हवेत शॉट मारला. त्यावेळी दोन रन घेण्याच्या विचारात असलेल्या वॉर्नरचा अंदाज चुकला. अय्यरने सीमारेषेवरुन धावत येत स्टम्पवर बॉल मारला. बॉल स्टम्पवर लागल्यानंतर वॉर्नर क्षणाचाही विलंब न लावता पॅव्हेलियनकडे जाऊ लागला.

आऊट झाला तेव्हा वॉर्नर 83 रनवर खेळत होता. वॉर्नरने त्याच्या खेळीमध्ये तीन सिक्स आणि सात फोरही लगावल्या. पहिल्या वनडेमध्येही त्याने 69 रनची खेळी केली होती.

दुसरीकडे स्मिथने या मॅचमध्येही शतक केलं. 64 बॉलमध्ये 104 रन करून स्मिथ आऊट झाला. स्मिथचं भारताविरुद्धचं हे पाचवं आणि लागोपाठ दुसरं शतक आहे. पहिल्या वनडेमध्येही त्याने शतकी खेळी केली होती. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या पाचही बॅट्समननी अर्धशतकापेक्षा जास्तची खेळी केली. मॅक्सवेलने 29 बॉलमध्येच नाबाद 63 रन केले, यामध्ये चार सिक्स आणि चार फोर होते.

First published: