IND vs AUS : स्मिथला असं आऊट करा, सचिनचा भारतीय बॉलरना 'गुरू'मंत्र

IND vs AUS : स्मिथला असं आऊट करा, सचिनचा भारतीय बॉलरना 'गुरू'मंत्र

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. या दौऱ्याआधी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने टीम इंडियाच्या बॉलरना स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) ला आऊट करण्याचा गुरूमंत्र दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर : टीम इंडिया (Team India) च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. या दौऱ्याआधी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने टीम इंडियाच्या बॉलरना स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) ला आऊट करण्याचा गुरूमंत्र दिला आहे. स्टीव्ह स्मिथविरुद्ध पाचव्या स्टम्पवर बॉलिंग करण्याचा सल्ला सचिनने भारताच्या फास्ट बॉलरना दिला आहे.

'स्मिथचं तंत्र पारंपारिक नाही. बहुतेकवेळा टेस्ट मॅचमध्ये आपण बॉलरला ऑफ स्टम्प किंवा चौथ्या स्टम्पवर बॉलिंग करायला सांगतो, पण स्मिथ बॅटिंग करताना हलतो, त्यामुळे बॉलची लाईन चार ते पाच इंच आणखी पुढे पाहिजे,' असं सचिन पीटीआयशी बोलताना म्हणाला.

'स्मिथच्या बॅटच्या कडेला बॉल लागण्यासाठी चौथ्या आणि पाचव्या स्टम्पवर बॉलिंग केली गेली पाहिजे. हे काही वेगळं नाही, फक्त लाईनमध्ये मानसिक रुपाने बदल करावे लागतील. स्मिथ शॉर्ट पिच बॉलिंगसाठी तयार असल्याचं मी ऐकलं. त्यामुळे भारतीय बॉलर शॉर्ट पिच बॉलिंग टाकतील, असं त्याला वाटत असेल. पण त्याची ऑफ स्टम्पच्या बाहेरच परीक्षा घेतली गेली पाहिजे. त्याला बॅकफूटवर खेळवलं तर सुरुवातीलाच त्याला चूक करायला लावा,' असा सल्ला सचिनने दिला.

जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्यामुळे भारताची फास्ट बॉलिंग आक्रमक आहे, पण टीमला एक रक्षात्मक बॉलर ठेवावा लागेल, असं सचिनला वाटतं. 'सध्याची भारतीय फास्ट बॉलिंग इतिहासातली सर्वोत्तम आणि संतुलित आहे. टेस्ट मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला 20 विकेट घ्यायची गरज असते. पण 20 विकेट घेताना तुम्ही जास्त रन देणंही योग्य नाही. त्यामुळे आक्रमक बॉलिंगसोबतच एक असाही बॉलर असावा जो प्रतिकूल खेळपट्टीवर एका बाजूने रन बनवून देणार नाही, आणि मेडन ओव्हर टाकून प्रतिस्पर्धी टीमवर दबाव टाकेल', असं वक्तव्य सचिनने केलं.

मयंक अग्रवालचं खेळणं निश्चित असल्याचं मला वाटत असल्याचं सचिन म्हणाला. 'मयंक मोठी खेळी करू शकतो, त्यामुळे तो टीममध्ये दिसेल. रोहित फिट असेल, तर त्याला खेळवलं पाहिजे. पृथ्वी शॉ आणि केएल राहुल यांच्याबाबत टीमने निर्णय घ्यावा, कारण कोण फॉर्ममध्ये आहे, ते त्यांना माहिती आहे,' असं सचिनने सांगितलं.

Published by: Shreyas
First published: November 25, 2020, 3:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading