IND vs AUS : ...तरच रोहित ऑस्ट्रेलियात खेळणार, BCCI ने केलं स्पष्ट

IND vs AUS : ...तरच रोहित ऑस्ट्रेलियात खेळणार, BCCI ने केलं स्पष्ट

टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) याला नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) ने फिट घोषित केलं आहे, त्यामुळे रोहितचा ऑस्ट्रेलियाला (India vs Australia) जायचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) याला नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) ने फिट घोषित केलं आहे, त्यामुळे रोहितचा ऑस्ट्रेलियाला जायचा मार्ग मोकळा झाला आहे. पण ऑस्ट्रेलियात गेल्यानंतरही रोहितची फिटनेस टेस्ट घेण्यात येणार आहे. या फिटनेस टेस्टनंतरच रोहित सीरिजच्या उरलेल्या दोन मॅच खेळेल का नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल, असं बीसीसीआय (BCCI) ने स्पष्ट केलं आहे. बोर्डाने रोहितच्या फिटनेसबाबत अधिकृत माहिती दिली आहे. पण रोहित ऑस्ट्रेलियाला कधी जाणार? याबाबत अजून बोर्डाकडून काहीही सांगण्यात आलं नाही, पण तो एक ते दोन दिवसात ऑस्ट्रेलियाला पोहोचेल, असं बोललं जात आहे.

ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर कोरोना प्रोटोकॉलमुळे रोहितला 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. बीसीसीआयने सांगितल्यानुसार रोहितला हॉटेलमध्ये फिटनेससाठी काय करायचं आहे, याचं वेळापत्रक तयार केलं जात आहे. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर मेडिकल टीम त्याची फिटनेस टेस्ट घेईल. त्यानंतर रोहितच्या खेळण्यावर निर्णय घेतला जाईल. रोहित फिट झाला तर 7 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टेस्टसाठी तो उपलब्ध असेल.

सध्या रोहित फिट

आयपीएल खेळताना रोहितला मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती, त्यानंतर तो बंगळुरूच्या एनसीएमध्ये फिट होण्यासाठी गेला. तिकडे मेडिकल टीमने रोहितची फिटनेस टेस्ट घेतली, या फिटनेस टेस्टमध्ये रोहित पास झाला. एनसीएमध्ये रोहितची बॅटिंग, फिल्डिंग आणि रनिंगची टेस्ट घेण्यात आली. एनसीएच्या मेडिकल टीमने रोहितला फिट घोषित केलं.

रोहितच्या दुखापतीवरुन वाद

मागच्या महिन्यात आयपीएलदरम्यान रोहित शर्माला झालेल्या दुखापतीवरुन वाद झाला होता. मांडीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नाही, पण काही मॅच विश्रांती घेतल्यानंतर रोहित आयपीएल खेळण्यासाठी पुन्हा मैदानात उतरला. आयपीएलसाठी फिट असणारा रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिट कसा नाही? असा सवाल उपस्थित करण्यात आला. यानंतर रोहित एनसीएमध्ये दुखापतीवर उपचार घेण्यासाठी आणि फिट होण्यासाठी गेला. विराटनेही रोहितच्या दुखापतीबाबत आम्हाला अंधारात ठेवण्यात आल्याचं सांगितलं. रोहित ऑस्ट्रेलियाला का आला नाही, याबाबत मला माहिती नाही, अशी धक्कादायक प्रतिक्रिया विराटने दिली. यानंतर बीसीसीआयला रोहितच्या दुखापतीबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.

Published by: Shreyas
First published: December 12, 2020, 3:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या