IND vs AUS : ऑस्ट्रेलियात कोणत्या क्रमांकावर बॅटिंग करणार? रोहितने दिलं उत्तर

सध्या बँगलोरच्या एनसीए (NCA) मध्ये फिटनेस मिळवण्यासाठी आलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाला टेस्ट सीरिजसाठी रवाना होणार आहे.

सध्या बँगलोरच्या एनसीए (NCA) मध्ये फिटनेस मिळवण्यासाठी आलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाला टेस्ट सीरिजसाठी रवाना होणार आहे.

  • Share this:
    बँगलोर, 22 नोव्हेंबर : सध्या बँगलोरच्या एनसीए (NCA) मध्ये फिटनेस मिळवण्यासाठी आलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाला टेस्ट सीरिजसाठी रवाना होणार आहे. आयपीएल (IPL 2020) दरम्यान मांडीच्या स्नायूला दुखापत झाल्यामुळे रोहित वनडे आणि टी-20 सीरिजला मुकणार आहे. ऑस्ट्रेलियातल्या टेस्ट सीरिजमध्ये आपण टीमला पाहिजे, त्या क्रमांकावर बॅटिंग करू असं रोहित म्हणाला आहे. पहिल्या टेस्टनंतर टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार आहे. त्यामुळे उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्यासोबत रोहितला मोठी जबाबदारी पार पाडायची आहे. पीटीआयशी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, 'मी सगळ्यांना सांगितलं आहे, ते परत सांगतो. टीमला जिकडे हवं, तिकडे मी बॅटिंग करायला तयार आहे. पण ते ओपनिंग बॅट्समन म्हणून माझी भूमिका बदलतील का नाही, याबाबत मला माहिती नाही. विराट परतल्यानंतर पर्यायी खेळाडूंचा विचार टीम प्रशासनाने नक्कीच केला असेल. तिकडे पोहोचल्यानंतरच टीमला मी कोणत्या क्रमांकावर खेळण्यासाठी हवा आहे, ते स्पष्ट होईल. त्यांना पाहिजे त्या क्रमांकावर मी बॅटिंग करायला तयार आहे.' ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्टीवर बॉल उसळी मारतो, असं बोललं जातं, पण पर्थ सोडलं तर मागच्या काही वर्षात ऍडलेड, मेलबर्न आणि सिडनीमध्ये बॉलने एवढी उसळी घेतली नसल्याची प्रतिक्रिया रोहितने दिली. ओपनिंग करायची असेल, तर मला कट आणि पूल शॉट मारण्याबाबत विचार करावा लागेल. जेवढं शक्य आहे तेवढेवेळा मला व्ही मध्ये आणि सरळ शॉट मारावे लागतील, असं रोहितने सांगितलं.
    Published by:Shreyas
    First published: