मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS: सिडनी टेस्टमध्ये रोहित शर्मा घेणार 'या' दोघांपैकी एकाची जागा

IND vs AUS: सिडनी टेस्टमध्ये रोहित शर्मा घेणार 'या' दोघांपैकी एकाची जागा

रोहित शर्माची (Rohit Sharma) BCCI नं उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. रोहितची ही नियुक्ती होताच सिडनी टेस्टमध्ये तो खेळणार की नाही? याबद्दलच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

रोहित शर्माची (Rohit Sharma) BCCI नं उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. रोहितची ही नियुक्ती होताच सिडनी टेस्टमध्ये तो खेळणार की नाही? याबद्दलच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

रोहित शर्माची (Rohit Sharma) BCCI नं उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. रोहितची ही नियुक्ती होताच सिडनी टेस्टमध्ये तो खेळणार की नाही? याबद्दलच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

मेलबर्न, 2 जानेवारी:  आयपीएल (IPL) स्पर्धेच्या दरम्यान जखमी झालेला भारताचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आता फिट झाला आहे. तो यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुनरागमन करण्यास सज्ज आहे. रोहित शर्माची BCCI नं उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. रोहितची ही नियुक्ती होताच सिडनी टेस्टमध्ये तो खेळणार की नाही? याबद्दलच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. रोहितची अंतिम 11 मधील जागा पक्की आहे. त्यामुळे मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari) यांच्यापैकी एकाला बाहेर बसावं लागणार आहे.

दोघांचीही कामगिरी साधारण

मयंक आणि विहारी या दोघांनाही या टेस्ट सीरिजमध्ये फारशी कमाल करता आलेली नाही. पहिल्या टेस्टमध्ये मयंक पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सोबत सलामीला उतरला होता. त्यावेळी मयंक दोन्ही इनिंगमध्ये फ्लॉप ठरला. मयंकपेक्षा पृथ्वी शॉ च्या अपयशाची चर्चा जास्त झाली. त्यामुळे मेलबर्न टेस्टमधून त्याला वगळण्यात आलं. तर, मयंकला आणखी एक संधी मिळाली.

मेलबर्नमध्येही मयंक फ्लॉप ठरला. मेलबर्नमध्ये त्याला पहिल्या इनिंगमध्ये भोपळाही फोडता आला नाही. तर दुसऱ्या इनिंगमध्ये तो फक्त पाच रन काढून आऊट झाला. तर दुसरीकडे शुभमन गिलनं त्याच्या पदार्पणातच चांगली कामगिरी केली. त्यामुळे आता मयंकवर हकालपट्टीची टांगती तलवार आहे.

मयंकचा ऑस्ट्रेलियात चांगला रेकॉर्ड

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी झालेल्या IPL स्पर्धेत मयंकनं 424 रन्स काढले होते. त्यानं टेस्ट कारकीर्दीमध्ये पदार्पण ऑस्ट्रेलियात केलं होतं. 2018 साली त्यांनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या त्याच्या पहिल्या टेस्टमध्ये एकूण 118 तर दुसऱ्या टेस्टमध्ये 77 रन्स केले होते. त्यानं आजवरच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये तीन शतक लगावली आहेत. यामध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे.

विहारीला का धोका?

रोहित शर्मा सलामीला न येत मिडल ऑर्डरमध्ये खेळणार अशीही चर्चा आहे. तसं झालं तर हनुमा विहारीला बाहेर बसावं लागेल. विहारीनं या सीरिजमधील तीन इनिंगमध्ये बॅटींग केली आहे. त्यामध्ये त्यानं 45 रन्स केले आहेत.

First published:
top videos

    Tags: Cricket