मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाचा विजय, रोहितने दिली ही प्रतिक्रिया

IND vs AUS : विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाचा विजय, रोहितने दिली ही प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा (India vs Australia) 6 विकेटने विजय झाला. याचसोबत भारताने ही टी-20 सीरिजही जिंकली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या अनुपस्थितीमध्ये भारताने हा विजय मिळवला.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 7 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा 6 विकेटने विजय झाला. याचसोबत भारताने ही टी-20 सीरिजही जिंकली आहे. पहिल्या मॅचमध्ये भारताने 11 रनने विजय मिळवला होता. त्यामुळे भारताने तीन मॅचच्या या सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या मॅचमध्ये भारताने शेवटच्या 5 ओव्हरमध्ये 54 रन केले. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या अनुपस्थितीमध्ये भारताने हा विजय मिळवला. सीरिज विजयानंतर रोहित शर्मानेही खेळाडूंचं कौतुक केलं. आयपीएल (IPL) मध्ये मुंबईला पाचव्यांदा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे तो ऑस्ट्रेलियाला जाऊ शकला नाही. आता टी-20 सीरिज जिंकल्यानंतर रोहित म्हणाला, 'टीम इंडियासाठी हा सीरिज विजय जबरदस्त आहे. टीमला ज्याप्रकारे विजय मिळाला, ते पाहून चांगलं वाटलं. प्रत्येकाला खूप खूप शुभेच्छा.' रोहितच्या दुखापतीवरुन वाद रोहित शर्मा याच्या दुखापतीवरुन बराच वाद झाला होता. रोहितच्या दुखापतीबाबत स्पष्टपणे काही सांगितलं गेल नसल्याचं विराट कोहली ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यावर म्हणाला होता. रोहित ऑस्ट्रेलियाला का आला नाही आणि त्याची दुखापत आता कशी आहे, याबाबत आपल्याला माहिती नसल्याची प्रतिक्रिया विराटने दिली होती. विराटच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद झाला होता, अखेर बीसीसीआयला या मुद्द्यावर रातोरात स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. आयपीएलवेळी दुखापतग्रस्त झाल्यामुळे रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नाही. पण आयपीएलदरम्यान रोहितने नेटमध्ये सराव केला. काही मॅच विश्रांती घेतल्यानंतर तो मैदानात मॅच खेळण्यासाठीही उतरला. रोहित आयपीएल खेळण्यासाठी फिट आहे, मग भारताकडून खेळण्यासाठी नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. रोहित हा सध्या एनसीएमध्ये त्याच्या दुखापतीवर उपचार घेत आहे. एनसीएने रोहितला फिट घोषित केलं, तरी त्याला ऑस्ट्रेलियातल्या सुरुवातीच्या दोन मॅच मुकाव्या लागतील. कोरोनामुळे ऑस्ट्रेलियात 14 दिवस क्वारंटाईन होणं बंधनकारक आहे. त्यामुळे रोहित फिट झाला तरी शेवटच्या दोन टेस्ट मॅचसाठीच उपलब्ध असेल.
First published:

पुढील बातम्या