Home /News /sport /

IND vs AUS : मोठी बातमी, रोहित शर्माच्या फिटनेस टेस्टचा रिपोर्ट आला

IND vs AUS : मोठी बातमी, रोहित शर्माच्या फिटनेस टेस्टचा रिपोर्ट आला

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या एनसीए (NCA)मधल्या फिटनेस टेस्टचा रिपोर्ट आला आहे. आज सकाळीच एनसीए प्रमुख राहुल द्रविड (Rahul Dravid)च्या उपस्थितीमध्ये रोहित शर्माची फिटनेस टेस्ट घेण्यात आली.

    बंगळुरू, 11 डिसेंबर : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या एनसीए (NCA)मधल्या फिटनेस टेस्टचा रिपोर्ट आला आहे. आज सकाळीच एनसीए प्रमुख राहुल द्रविड (Rahul Dravid)च्या उपस्थितीमध्ये रोहित शर्माची फिटनेस टेस्ट घेण्यात आली. या फिटनेस टेस्टमध्ये रोहित शर्मा पास झाला आहे. आयपीएल (IPL 2020) दरम्यान रोहित शर्माच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती. यानंतर रोहित उपचारासाठी 19 नोव्हेंबरला बंगळुरूच्या एनसीएमध्ये गेला होता. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी फिट झाला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. 'रोहित शर्मा फिटनेस टेस्ट पास झाला आहे, आता त्याच्या भवितव्याबाबत निवड समिती निर्णय घेईल,' अशी माहिती सूत्राने दिली. सुरुवातीला रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या कोणत्याही सीरिजमध्ये संधी देण्यात आली नव्हती, पण यानंतर रोहित जर फिटनेस टेस्ट पास झाला, तर त्याची टेस्ट टीममध्ये निवड होईल, असं बीसीसीआयने सांगितलं होतं. 'बीसीसीआयची मेडिकल टीम रोहित शर्मावर लक्ष ठेवून आहे, याबाबत निवड समितीलाही सांगण्यात आलं आहे. रोहित शर्माशी सल्लामसलत करून त्याला वनडे आणि टी-20 सीरिजसाठी विश्रांती देण्यात येत आहे. तसंच तो पूर्णपणे फिट झाला, तर त्याची टेस्ट सीरिजसाठी निवड होईल,' असं प्रसिद्धी पत्रक बीसीसीआयने काढलं होतं. तिसरी टेस्ट खेळणार रोहित? रोहित शर्मा जरी ऑस्ट्रेलियात पोहोचला तरी तो किती टेस्ट मॅच खेळणार, याबाबतही प्रश्न आहे. ऑस्ट्रेलियातल्या सरकारी नियमांनुसार तिकडे पोहोचल्यावर प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागतं. रोहित जर 12 किंवा 13 डिसेंबरला ऑस्ट्रेलियाला पोहोचला, तरी त्याला 26 डिसेंबरपर्यंत क्वारंटाईन व्हावं लागेल, त्यामुळे तो बॉक्सिंग डे टेस्ट खेळू शकणार नाही. त्यामुळे तो सिडनीमध्ये 7 जानेवारीपासून होणाऱ्या तिसऱ्या टेस्टपासूनच उपलब्ध होऊ शकतो. रोहितच्या दुखापतीचा वाद मागच्या महिन्यात आयपीएलदरम्यान रोहित शर्माला झालेल्या दुखापतीवरुन वाद झाला होता. मांडीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नाही, पण काही मॅच विश्रांती घेतल्यानंतर रोहित आयपीएल खेळण्यासाठी पुन्हा मैदानात उतरला. आयपीएलसाठी फिट असणारा रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिट कसा नाही? असा सवाल उपस्थित करण्यात आला. यानंतर रोहित एनसीएमध्ये दुखापतीवर उपचार घेण्यासाठी आणि फिट होण्यासाठी गेला. विराटनेही रोहितच्या दुखापतीबाबत आम्हाला अंधारात ठेवण्यात आल्याचं सांगितलं. रोहित ऑस्ट्रेलियाला का आला नाही, याबाबत मला माहिती नाही, अशी धक्कादायक प्रतिक्रिया विराटने दिली. यानंतर बीसीसीआयला रोहितच्या दुखापतीबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या