IND vs AUS : धक्कादायक! म्हणून रोहित ऑस्ट्रेलियाला न जाता भारतात परतला

IND vs AUS : धक्कादायक! म्हणून रोहित ऑस्ट्रेलियाला न जाता भारतात परतला

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या वनडे सीरिजला शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. या सीरिजसाठी टीम इंडिया त्यांच्या सगळ्यात मोठा मॅच विनर रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मुकणार आहे.

  • Share this:

मुंबई, 26 नोव्हेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या वनडे सीरिजला शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. या सीरिजसाठी टीम इंडिया त्यांच्या सगळ्यात मोठा मॅच विनर रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मुकणार आहे. फिट नसल्यामुळे रोहित वनडे आणि टी-20 सीरिजला मुकणार आहे. आयपीएल (IPL 2020)च्या वेळी रोहित शर्माला दुखापत झाली, त्यामुळे आता तो बँगलोरच्या एनसीएमध्ये फिटनेस मिळवण्यासाठी गेला आहे.

फिट नसल्यामुळे रोहितला वनडे आणि टी-20 मध्ये जागा मिळाली नसली तरी त्याच्या ऑस्ट्रेलियाला न जाण्याबाबत नवं कारण समोर आलं आहे. क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांनी रोहित ऑस्ट्रेलियाला का गेला नाही, याचं कारण सांगितलं आहे. रोहित शर्माच्या वडिलांना कोरोना झाल्यामुळे तो ऑस्ट्रेलियाला गेला नाही.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार रोहितच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचं बोरिया मुजुमदार यांनी सांगितलं. आयपीएल संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाला न जाता रोहित वडिलांसाठी मुंबईला आला. पण यानंतर तो थेट एनसीएमध्ये रवाना झाला. ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज खेळण्यासाठी तो एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट पास करण्यासाठी गेला आहे.

दुसऱ्या टेस्टमध्ये रोहित शर्माा आणि इशांत शर्मा यांची निवड होऊ शकते, जर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बीसीसीआयची मागणी मान्य केली तर. बीसीसीआयने रोहित आणि इशांतच्या क्वारंटाईन कालावधी कमी करावा, अशी मागणी केली आहे. बीसीसीआयची ही मागणी मान्य झाली तर इशांत आणि रोहित बॉक्सिंग डे टेस्टसाठी उपलब्ध होतील. ही दुसरी टेस्ट मॅच 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरू होणार आहे. या दोन्ही खेळाडूंना जर दुसऱ्या टेस्टपासून संधी मिळाली, तर भारताची टीम आणखी मजबूत होईल.

Published by: Shreyas
First published: November 26, 2020, 7:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या