पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणतो, पैशांसाठी ऑस्ट्रेलिया भारताला जिंकण्याची संधी देईल

पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणतो, पैशांसाठी ऑस्ट्रेलिया भारताला जिंकण्याची संधी देईल

टीम इंडिया (Team India) च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. या दौऱ्यात भारत तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाला जिंकण्याची चांगली संधी आहे, असं मत पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी मांडलं आहे.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : टीम इंडिया (Team India) च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. या दौऱ्यात भारत तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाला जिंकण्याची चांगली संधी आहे, असं मत पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी मांडलं आहे. ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजसाठी बॉलरना अनुकूल खेळपट्टी तयार करणार नाही, असं रमीझ राजा यांना वाटत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टेस्ट सीरिजला 17 डिसेंबरपासून ऍडलडेमध्ये सुरुवात होईल. ही टेस्ट मॅच डे-नाईट असेल.

रमीझ राजा आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाले, 'ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्ट्या पूर्वी होत्या, तशा राहिल्या नाहीत. आता खेळपट्ट्यांमध्ये उसळी कमी आहे. बॉलही फार हालत नाही, त्यामुळे बॉलरसाठी अनुकूल वातावरण नाही. प्रेक्षकांच्या संख्येची गरज लक्षात घेता, मॅच पाच दिवस चालावी, असं ऑस्ट्रेलियाला वाटत असेल.'

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला बरंच नुकसान झालं आहे, त्यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजमधून ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाला बऱ्याच अपेक्षा आहेत, यावरही रमीझ राजा यांनी भाष्य केलं. 'क्रिकेट ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धच्या सीरिजमधून फायदा करुन घ्यायची गरज आहे. त्यांना माहिती आहे की मैदानात येणारे दर्शक आणि टीव्हीवर मॅच बघणाऱ्या प्रेक्षकांमुळे मिळणारा पैसा किती महत्त्वाचा आहे, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे टेस्ट मॅच पाच दिवस चालण्यासारख्याच खेळपट्ट्या बनवल्या जातील,' असं वक्तव्य रमीझ राजा यांनी केलं.

भारताची बॅटिंग मजबूत

'भारताची बॅटिंग ऑस्ट्रेलियाला मात देऊ शकते. सोबतच त्यांची बॉलिंगही सुधारली आहे. भारताचं बॉलिंग आक्रमण खूप चांगलं आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या डोक्यातही या गोष्टी असतील. वनडे आणि टी-20 सीरिजमध्ये भारताला रोहित शर्माची गैरहजेरी जाणवेल, कारण तो मर्यादित ओव्हरमधला जगातला सर्वोत्तम खेळाडू आहे,' अशी प्रतिक्रिया रमीझ राजा यांनी दिली. मांडीच्या स्नायूला दुखापत झाल्यामुळे रोहित फक्त टेस्ट सीरिजमध्येच खेळणार आहे.

Published by: Shreyas
First published: November 19, 2020, 7:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या