Home /News /sport /

IND vs AUS : 'कोरोना'नंतर भारताची पहिली सीरिज, पण हे 5 प्रश्न अजूनही कायम

IND vs AUS : 'कोरोना'नंतर भारताची पहिली सीरिज, पण हे 5 प्रश्न अजूनही कायम

कोरोना व्हायरसमुळे 9 महिने एकही मॅच न खेळलेली टीम इंडिया ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्यासाठी गेली.

    कॅनबेरा, 2 डिसेंबर : कोरोना व्हायरसमुळे 9 महिने एकही मॅच न खेळलेली टीम इंडिया ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्यासाठी गेली. या दौऱ्यातल्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा 2-1 ने पराभव झाला. कोरोनानंतरच्या या पहिल्याच सीरिजमध्ये टीम इंडियाचे जुनेच प्रश्न अजूनही कायम आहेत. याच 5 प्रश्नांवर आपण नजर टाकणार आहोत. बॉलरकडून निराशा ऑस्ट्रेलियामध्ये जाताना टीम इंडियाची बॉलिंग कागदावर तरी मजबूत दिसत होती. पण वनडे सीरिजमध्ये बुमराह आणि शमी यांच्याकडून निराशाजनक कामगिरी करण्यात आली. मधल्या फळीचा प्रश्न अजूनही कायम 2019 वर्ल्ड कपपासून टीम इंडियाच्या कमकुवत असलेल्या मधल्या फळीची विशेषत: चौथ्या क्रमांकाच्या बॅट्समनची चर्चा सुरू होती, पण अजूनही मधली फळी कमकूवत असल्याचंच या सीरिजनंतरही समोर आलं आहे. चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या श्रेयस अय्यरला तीन मॅचमध्ये एकदाही 40 रनचा आकडा पार करता आला नाही. तर केएल राहुल यालाही सातत्य दाखवता आलं नाही. हार्दिक पांड्या बॅट्समन का ऑलराऊंडर? हार्दिक पांड्याने या सीरिजमध्ये बॅटने चमकदार कामगिरी केली आहे, पण फक्त एकाच मॅचमध्ये त्याने बॉलिंग केली. हार्दिकच्या बॉलिंग न करण्याची मोठी किंमत टीम इंडियाला या सीरिजमध्ये चुकवावी लागली. कारण बॉलरमध्ये विराटकडे पाचच पर्याय शिल्लक राहिले. बॉलिंगचे पर्याय हार्दिक पांड्या बॉलिंग करत नसल्यामुळे टीम इंडियाचे सुरुवातीचे सगळे सहा खेळाडू फक्त बॅट्समनच आहेत, यापैकी कोणीही बॉलिंग करू शकत नाही. अशात एखाद्या बॉलरचा दिवस खराब असल्यास विराटकडे कोणताही पर्याय दिसत नाही. पहिल्या दोन्ही वनडेमध्येही युझवेंद्र चहल आणि नवदीप सैनी यांच्यावर ऑस्ट्रेलियन बॅट्सन आक्रमण करत होते तेव्हा विराटकडे या दोघांना बॉलिंग देण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. धोनी कर्णधार असताना भारतीय टीमकडे बॉलिंगसाठी बरेच पर्याय उपलब्ध असायचे. त्यावेळी धोनी सचिन, सेहवाग, रैना, युवराज, युसुफ पठाण यांचा बॉलर म्हणूनही वापर करून घ्यायचा. आता मात्र टीममधला कोणताच बॅट्समन बॉलिंग करत नाही. रोहित-विराटवर अवलंबून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर भारतीय टीम अवलंबून असल्याचं पुन्हा एकदा या सीरिजदरम्यान दिसून आलं. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये पहिल्या दोन मॅचमध्ये शिखर धवन आणि मयंक अग्रवाल यांनी ओपनिंगला बॅटिंग केली, पण चांगली सुरुवात देऊनही या दोघांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तर तिसऱ्या वनडेमध्ये शुभमन गिलला टीममध्ये संधी देण्यात आली, पण तोदेखील चांगली सुरुवात करून माघारी परतला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या