सिडनी, 13 डिसेंबर : भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए (India vs Australia) यांच्यातल्या सराव सामन्यात भारतीय बॅट्समननी दमदार कामगिरी केली. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या शुभमन गिल (Shubhaman Gill) याने 65 रनची खेळी केली. पण तो कॅच आऊट झाला. शुभमन गिलच्या आऊट होण्यावर आता प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने शुभमन गिल याच्या आऊट होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
शुभमन गिलने मिचेल स्वीपसन याने टाकलेला बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या टीमने एलबीडब्ल्यूसाठी अपील केलं, याचदरम्यान स्लिपमध्ये उभ्या असलेल्या एबॉटने उडी मारून कॅच पडकला. यानंतर अंपायरने शुभमन गिलला आऊट दिलं.
अंपायरने आऊट दिल्यानंतर शुभमन गिललाही धक्का बसला आणि तो काही काळ क्रीजवरच उभा राहिला. आकाश चोप्रा यानेही ट्विट करून शुभमन गिल नेमका कसा आऊट झाला? असा प्रश्न विचारला. तो एलबीडब्ल्यू नव्हता, तसंच तो कॅच आऊट झाल्याचंही स्पष्ट दिसत नव्हतं, असं आकाश चोप्रा म्हणाला आहे.
Gill given out caught, and what a catch it was too!
What's your call? #AUSAvIND pic.twitter.com/fDFwB7IUBU
— cricket.com.au (@cricketcomau) December 12, 2020
सराव सामन्यादरम्यान डीआरएस आणि स्निकोमीटरचं तंत्र वापरलं जात नाही, त्यामुळे शुभमन गिलला त्याची विकेट गमवावी लागली. तसंच डीआरएस नसल्यामुले गिलला अंपायरच्या निर्णयाला आव्हानही देता आलं नाही. या मॅचदरम्यान शुभमन गिल आणि मयंक अगरवाल यांच्यात 104 रनची पार्टनरशीप झाली.
दुसऱ्या सराव सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताने 194 रन केले होते, यानंतर ऑस्ट्रेलिया ए ची इनिंग 108 रनवरच संपली. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताने 383-4 वर डाव घोषित केला. मयंक अगरवालने 61 रन, हनुमा विहारीने नाबाद 104 रन, ऋषभ पंत नाबद 103 रन आणि अजिंक्य रहाणेने 38 रन केले.