IND vs AUS : पृथ्वी शॉ का शेन वॉर्न? हा भन्नाट लेग स्पिन बघितलात का

IND vs AUS : पृथ्वी शॉ का शेन वॉर्न? हा भन्नाट लेग स्पिन बघितलात का

यंदाच्या वर्षी झालेल्या आयपीएल (IPL 2020) मध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) दोन्ही सराव सामन्यात त्याला बॅटिंगने छाप पाडता आली नाही. पण त्याने टाकलेला एक बॉल पाहून सगळेच हैराण झाले.

  • Share this:

सिडनी, 15 डिसेंबर : यंदाच्या वर्षी झालेल्या आयपीएल (IPL 2020) मध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) अपयशी ठरला. 13 मॅचमध्ये शॉने फक्त 228 रन केले, यानंतर त्याला दिल्ली (Delhi Capitals) च्या टीमने बाहेर बसवलं. यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही पृथ्वी शॉची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. दोन्ही सराव सामन्यात पृथ्वी शॉने बॅटिंगमध्ये छाप पाडली नाही. पण त्याने टाकलेला एक बॉल पाहून सगळेच हैराण झाले.

सराव सामन्यामध्ये दुसरे ओपनर शुभमन गिल आणि मयंक अगरवाल यांनी दुसऱ्या मॅचमध्ये अर्धशतक केलं, तर पृथ्वी शॉला चार इनिंगमध्ये 62 रन करता आले. यातले 40 रन तर एकाच इनिंगमधले आहेत. त्यामुळे पृथ्वी शॉला पहिल्या टेस्टमध्ये संधी मिळेल का नाही? याबाबत साशंकता आहे. एलन बॉर्डर आणि सुनिल गावसकर यांच्यासारख्या दिग्गजांनी रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये मयंक अगरवाल आणि शुभमन गिल यांनी ओपनिंगला खेळावं, असा सल्ला दिला आहे.

सराव सामन्याच्या चारही इनिंगमध्ये पृथ्वीच्या बॅटमधून रन आले नसले, तरी त्याने बॉलिंगमधून प्रभाव पाडला. पृथ्वी शॉने सराव सामन्यात तीन ओव्हर टाकल्या, यात त्याला एकही विकेट मिळाली नाही, पण त्याने टाकलेला लेग स्पिन बॅट्समन आणि विकेट कीपरलाही चुकवून गेला. मिडल आणि लेग स्टम्पवर पडलेला बॉल ऑफ स्टम्पच्या बाहेर गेला. ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन जॅक विल्डरमुथ यालाही हा बॉल खेळता आला नाही. विकेटकीपर ऋद्धीमान साहा आणि पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या अजिंक्य रहाणे यांच्या मधून शॉने टाकलेला बॉल गेला.

पृथ्वी शॉ याने इन्स्टाग्रामवर या बॉलचा व्हिडिओ शेयर केला आहे. कधी कधी अशी गिफ्ट चांगली वाटतात. सुरक्षित हात असलेल्या साहा आणि रहाणेलाही बॉलने चकवा दिला, असं शॉ या पोस्टमध्ये म्हणाला आहे.

View this post on Instagram

A post shared by PRITHVI SHAW (@prithvishaw)

टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीम

विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियाची टीम

टीम पेन, जो बर्न्स, पैट कमिन्स, कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जॉश हेजलवुड, ट्रेविस हेड, मोइजेस हेनिरक्स, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिचेल नेसल, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीप्सन, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर

Published by: Shreyas
First published: December 15, 2020, 1:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या