सिडनी, 8 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या वनडे आणि टी-20 सीरिजनंतर चार टेस्ट मॅचची टेस्ट सीरिज खेळवण्यात येणार आहे. मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहली (Virat Kohli)च्या नेतृत्वात भारताला टेस्ट सीरिजमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला होता. पण यावेळी कागदावर तरी ऑस्ट्रेलियाची टीम मजबूत वाटत आहे. या टेस्ट सीरिजआधी ऑस्ट्रेलियाचा 21 वर्षांचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन (Cameron Green) याने विराट कोहलीचं टेन्शन वाढवलं आहे. ग्रीनने भारताविरुद्ध सराव सामन्यात शानदार शतकी खेळी केली, याशिवाय त्याने भारताच्या दोन विकेटही घेतल्या.
ग्रीनने तीन दिवसांच्या या सराव सामन्यात दुसऱ्या दिवशी 125 रनची नाबाद खेळी केली.यामध्ये 12फोर आणि एक सिक्सचा समावेश होता. यानंतर ग्रीनने दोन विकेटही घेतल्या. ग्रीनने पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल याला माघारी धाडलं. पहिल्या इनिंगमध्ये ग्रीनला एकही विकेट मिळाली नव्हती. पहिल्या टेस्टमध्ये ग्रीनला संधी मिळण्याची शक्यता आहे. मागच्याच आठवड्यात ग्रीनने भारताविरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केलं होतं.
Another day, another century for Cameron Green as he pushes for a Test debut this summer. Some of these shots are #AUSAvINDpic.twitter.com/KKLGzOqR28
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि कॉमेंटेटर इयन चॅपल यांनीही कॅमरून ग्रीन याचं कौतुक केलं होतं. हा युवा खेळाडू चमकदार कामगिरी करू शकतो, असं चॅपल म्हणाले होते. ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमध्ये ग्रीनने ऍडलेडच्या मैदानात 197 रनची शानदार खेळी केली होती. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या ग्रीनने 2017 साली पदार्पण केलं होतं, त्या मॅचमध्ये ग्रीनने 24 रन देऊन 5 विकेट घेतल्या होत्या.
मागच्यावर्षी गाबाच्या मैदानातही ग्रीनने 87 आणि 121 रनची नाबाद खेळी केली होती. तेव्हापासूनच ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीची नजर ग्रीनवर होती.