IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का, बुमराहने मारलेला बॉल ग्रीनच्या डोक्याला लागला

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का, बुमराहने मारलेला बॉल ग्रीनच्या डोक्याला लागला

भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचआधी ऑस्ट्रेलियाला (India vs Australia) आणखी एक धक्का बसला आहे. सराव सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन (Cameron Green) याच्या डोक्याला बॉल लागला आहे.

  • Share this:

सिडनी, 12 डिसेंबर : भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचआधी ऑस्ट्रेलियाला (India vs Australia) आणखी एक धक्का बसला आहे. सराव सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन (Cameron Green) याच्या डोक्याला बॉल लागला आहे. ग्रीन बॉलिंग करत असताना जसप्रीत बुमराहने स्ट्रेट ड्राईव्ह मारला. बुमराहने मारलेला हा बॉल ग्रीनच्या डोक्यावर जाऊन आदळला.

बुमराहने मारलेला शॉट रोखण्याचा प्रयत्न ग्रीनने केला, पण त्याच्या हातातून बॉल थेट डोक्याला लागला. ग्रीनच्या डोक्याला बॉल लागल्यानंतर नॉन स्ट्रायकर असलेला मोहम्मद सिराज त्याला बघायला गेला. दोन मिनिटांपर्यंत मेडिकल टीमने कॅमरून ग्रीनवर उपचार केले. यानंतर कॅमरून ग्रीन मैदानातून बाहेर गेला. कॅमरून ग्रीनच्याऐवजी पॅट्रिक रोव्ह कनकशन सबस्टिट्युट म्हणून मैदानात उतरला.

इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे डॉक्टर म्हणाले, 'कॅमरूनला बॉलिंग करताना बॉल लागला. त्याच्यासोबत पहिल्यांदाच असं झालं आहे. तो टीम हॉटेलमध्ये परतला आहे आणि सराव सामन्यात उरलेले दोन दिवस तो खेळणार नाही. त्याच्या तब्येतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, तसंच याबाबत तुम्हाला वेळोवेळी माहिती दिली जाईल.'

कॅमरून ग्रीनने मंगळवारी ड्रॉ झालेल्या पहिल्या सराव सामन्यात भारताविरुद्ध नाबाद 125 रनची खेळी केली होती. या खेळीमुळे ग्रीन पहिल्या टेस्टमध्ये पदार्णप करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. याआधी सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन विल पुकोवस्की याच्या डोक्याला कार्तिक त्यागीने टाकलेला बॉल लागला, ज्यामुळे पुकोवस्कीच्या पहिल्या टेस्टमध्ये खेळण्याबाबतही साशंकता आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नर आधीच दुखापतीमुळे पहिल्या टेस्टमधून बाहेर आहे. सीरिजची पहिली टेस्ट 17 डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरू होईल. ही मॅच डे-नाईट असल्यामुळे गुलाबी बॉलने खेळवली जाईल.

Published by: Shreyas
First published: December 12, 2020, 9:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या