मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : ऑस्ट्रेलियात पोहोचताच टीम इंडियाची कोरोना टेस्ट, पाहा काय आले रिपोर्ट

IND vs AUS : ऑस्ट्रेलियात पोहोचताच टीम इंडियाची कोरोना टेस्ट, पाहा काय आले रिपोर्ट

आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलियात रवाना झाले. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर खेळाडूंना सराव सुरू करण्यासाठी कोरोना टेस्ट करणं आणि या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह येणं बंधनकारक होतं.

  • Published by:  Shreyas
सिडनी, 14 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलियात रवाना झाले. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर खेळाडूंना सराव सुरू करण्यासाठी कोरोना टेस्ट करणं आणि या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह येणं बंधनकारक होतं. सुदैवाने भारतीय टीमचे खेळाडू आणि सहयोगी स्टाफचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, त्यामुळे खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. बीसीसीआय (BCCI) ने ट्विटरवर खेळाडूंच्या सरावाचे आणि जिम सत्राचे फोटो शेयर केले आहेत. या फोटोमध्ये कुलदीप यादव, फास्ट बॉलर उमेश यादव, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर आणि चेतेश्वर पुजारा सराव करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये फास्ट बॉलर टी नटराजन आणि दीपक चहरदेखील आहेत. भारतीय टीम सध्या सिडनीमध्ये 14 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीमध्ये आहे. खेळाडूंची पहिली कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलनेही कुलदीप यादवसोबतचा एक फोटो शेयर केला आहे. 'कुलदीप यादवसोबत भारतीय टीममध्ये पुनरागमन. टीम इंडियासोबत सराव करताना हॅशटॅग कुलचा', असं कॅप्शन चहलने या फोटोला दिलं आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला वनडे सीरिजपासून सुरुवात होणार आहे. 27 नोव्हेंबरला पहिली वनडे, 29 नोव्हेंबरला दुसरी वनडे आणि 2 डिसेंबरला तिसरी वनडे होईल. यानंतर 4 डिसेंबरपासून टी-20 सीरिजला सुरुवात होईल. 6 डिसेंबरला दुसरी टी-20 आणि 8 डिसेंबरला तिसरी टी-20 मॅच खेळवली जाईल. टी-20 सीरिज संपल्यानंतर 17 डिसेंबरपासून टेस्ट सीरिजला सुरुवात होईल. पहिली टेस्ट ऍडलेडमध्ये डे-नाईट खेळवली जाईल, तर दुसरी टेस्ट 26 डिसेंबरपासून, तिसरी टेस्ट 7 जानेवारीपासून आणि चौथी टेस्ट 15 जानेवारीपासून खेळवली जाईल. टी-20 टीम विराट कोहली, शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन वनडे टीम विराट कोहली, शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, संजू सॅमसन टेस्ट टीम विराट कोहली, रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान सहा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव,रविंद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज
First published:

पुढील बातम्या