या खेळाडूचं भारताच्या टी-20 टीममध्ये पुनरागमन व्हावं, कैफची मागणी

या खेळाडूचं भारताच्या टी-20 टीममध्ये पुनरागमन व्हावं, कैफची मागणी

आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीम (Team India) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली, आयपीएलचा हा हंगाम आर अश्विन (R. Ashwin) याच्यासाठी चांगला राहिला, त्यामुळे अश्विनचं भारताच्या टी-20 टीममध्ये पुनरागमन व्हावं, अशी मागणी मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याने केली आहे.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) चा 13 वा मोसम संपल्यानंतर भारतीय टीम (Team India) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना झाली आहे. आयपीएल फायनलमध्ये मुंबई (Mumbai Indians) ने दिल्ली (Delhi Capitals) चा पाच विकेटने पराभव करत पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. कोरोना व्हायरसमुळे यंदाचं आयपीएल युएईमध्ये खेळवलं गेली. आयपीएलचा हा हंगाम आर अश्विन (R. Ashwin) याच्यासाठी चांगला राहिला, त्यामुळे अश्विनचं भारताच्या टी-20 टीममध्ये पुनरागमन व्हावं, अशी मागणी मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याने केली आहे.

दिल्लीकडून खेळताना अश्विनने 15 मॅचमध्ये 7.66 च्या इकोनॉमी रेटने 13 विकेट घेतल्या, यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे, पण तरीही मर्यादित ओव्हरमध्ये अश्विनची निवड झालेली नाही. 2017 सालापासून अश्विन फक्त टेस्ट क्रिकेट खेळत आहे.

'विराट कोहली, रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, कायरन पोलार्ड, डेव्हिड वॉर्नर, क्रिस गेल, करुण नायर, जॉस बटलर, स्टीव्ह स्मिथ, देवदत्त पडिक्कल आणि निकोलस पूरन, या खेळाडूंच्या विकेट अश्विनने आयपीएलमध्ये घेतल्या. यातले बहुतेक खेळाडू पावर प्लेमध्ये आऊट झाले. अश्विन अजूनही भारताला टी-20 क्रिकेटमध्ये उपयोगी आहे,' असं ट्विट कैफने केलं.

अश्विनची भारताच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी निवड झालेली नसली, तरी तो ऑस्ट्रेलियाला टीमसोबतच रवाना झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयने तिन्ही फॉरमॅटच्या टीमना एकत्र ऑस्ट्रेलियामध्ये पाठवून बायो बबलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अश्विनने टेस्ट सीरिजसाठी ऑस्ट्रेलियात सरावालाही सुरुवात केली आहे. अश्विनने रॅकेटच्या मदतीने टेनिस बॉल टाकून केएल राहुलला बॅटिंगचा सराव दिला.

टी-20 टीम

विराट कोहली, शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन

वनडे टीम

विराट कोहली, शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, संजू सॅमसन

टेस्ट टीम

विराट कोहली, रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान सहा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव,रविंद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज

Published by: Shreyas
First published: November 19, 2020, 9:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या