Home /News /sport /

IND vs AUS : मायकल होल्डिंग म्हणातात, भारताला जाणवतेय या खेळाडूची कमी

IND vs AUS : मायकल होल्डिंग म्हणातात, भारताला जाणवतेय या खेळाडूची कमी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारतीय टीम (India vs Australia) ने निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या मॅचमध्ये भारताचा 66 रनने पराभव झाला. वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू मायकल होल्डिंग (Michael Holding) यांनी या पराभवाचं कारण सांगितलं आहे.

पुढे वाचा ...
    सिडनी, 29 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारतीय टीम (India vs Australia) ने निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या मॅचमध्ये भारताचा 66 रनने पराभव झाला. भारतीय टीममध्ये स्टार खेळाडू असले तरी त्यांना एमएस धोनी (MS Dhoni) ची कमी जाणवत आहे. मोठ्या स्कोअरचा पाठलाग करताना धोनीचं कौशल्य आणि त्याची पद्धत कामाला येते, असं वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू मायकल होल्डिंग (Michael Holding) म्हणाले आहे. 'धोनी बहुतेकवेळा बॅटिंगसाठी खालच्या क्रमांकावर येतो आणि आव्हानाचा पाठलाग करताना नियंत्रण ठेवतो. तो टीममध्ये असताना भारताने चांगल्या पद्धतीने आव्हानांचा पाठलाग केला होता. भारताकडे प्रतिभावान बॅट्समन आहेत, जे मोठे शॉट खेळू शकतात. हार्दिकने शानदार बॅटिंग केली, पण भारताला धोनीसारख्या खेळाडूची गरज होती,' असं होल्डिंग त्यांचं युट्युब चॅनलवरचा शो 'होल्डिंग नथिंग बॅक' मध्ये म्हणाले. 'धोनी टीममध्ये होता तेव्हा आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय टीम आत्मविश्वासात असायची. टॉसनंतर फिल्डिंग करायला लागली तरी भारतीय टीम घाबरायची नाही, कारण त्यांना माहिती होतं, की आपल्याकडे धोनी आहे आणि तो काय करू शकतो. आव्हानाचा पाठलाग करताना धोनी कधीही घाबरायचा नाही. त्याला स्वत:च्या क्षमतेबाबत माहिती होती आणि तो कधीही विचलित व्हायचा नाही. जो धोनीसोबत बॅटिंग करायचा, त्याच्यासोबत तो बोलायचा आणि मदत करायचा. भारताची बॅटिंग उत्तम आहे, पण धोनीची गोष्टच वेगळी होती,' अशी प्रतिक्रिया होल्डिंग यांनी दिली. मायकल होल्डिंग यांनी टीम इंडियाच्या फिल्डिंगवरही टीका केली. सिडनीचं मैदान मोठं आहे, पण भारतीय टीमची फिल्डिंग अत्यंत खराब झाली, असं वक्तव्य होल्डिंग यांनी केलं. तसंच बॉल फिल्डरच्या डोक्यावरून गेला तरी सिक्स गेली नाही, सीमारेषा एवढ्या लांब ठेवायची गरज नव्हती, असं मतही त्यांनी मांडलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या