मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : मॅक्सवेलच्या आक्रमक खेळीनंतर केएल राहुलच्या मीम्सचा धुमाकूळ

IND vs AUS : मॅक्सवेलच्या आक्रमक खेळीनंतर केएल राहुलच्या मीम्सचा धुमाकूळ

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या वनडे सीरिजला शुक्रवारपासून सुरुवात झाली. या मॅचमध्ये ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) ने केलेल्या खेळीमुळे केएल राहुल (KL Rahul) याची मीम्स व्हायरल झाली.

  • Published by:  Shreyas

सिडनी, 28 नोव्हेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या वनडे सीरिजला शुक्रवारपासून सुरुवात झाली. दौऱ्यातल्या पहिल्याच सामन्यात भारतीय टीमला पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) ने धमाकेदार खेळी करत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. मॅक्सवेलने 19 बॉलमध्ये 45 रनची आक्रमक खेळी केली.

आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमात मॅक्सवेलने निराशाजनक कामगिरी केली, पण ऑस्ट्रेलियाकडून खेळताना मात्र मॅक्सवेल पुन्हा फॉर्ममध्ये आला. आयपीएलच्या पंजाब (KXIP) च्या टीमचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) भारताचा विकेट कीपर असल्यामुळे तो मागून मॅक्सवेलची ही खेळी पाहत होता. मॅक्सवेलच्या या खेळीनंतर सोशल मीडियावर केएल राहुलचे मीम्स व्हायरल झाले आहेत.

पंजाबचे बॅटिंग प्रशिक्षक वसीम जाफर यांनी देखील एक मीम शेअर केले आहे. याचबरोबर पंजाबच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून देखील ट्विट करण्यात आले. यामध्ये मॅक्सवेलची अशा प्रकारची बॅटिंग पाहणे आंबटगोड असल्याचे म्हटले आहे. पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला 10 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते, पण या स्पर्धेत त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याच्यावर मोठी टीका देखील करण्यात आली होती.

आयपीएलच्या या मोसमात मॅक्सवेलने 106 बॉल खेळून एकही सिक्स मारला नाही, पण कालच्या सामन्यात त्याने 19 बॉलमध्येच 3 सिक्स मारले. राहुल मागे उभा राहून हे सर्व पाहत होता. त्यामुळे चाहत्यांनी याचे मिम्स तयार करून व्हायरल केले.

या सामन्यात पहिले बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये 374 रनचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय टीमला 308 रनच करता आल्या. भारताच्या सुरुवातीच्या बॅट्समनना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. बॅटिंगमध्ये हार्दिक पंड्या आणि शिखर धवन यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनादेखील टीमला विजयापर्यंत नेता आलं नाही. त्यामुळे भारताला 66 रननी पराभव स्वीकारावा लागला.

First published: