Home /News /sport /

IND vs AUS : परिक्षणाशिवायच भारत ड्रॉप इन पिचवर खेळणार, काय आहे हे तंत्रज्ञान

IND vs AUS : परिक्षणाशिवायच भारत ड्रॉप इन पिचवर खेळणार, काय आहे हे तंत्रज्ञान

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये टीम इंडिया (Team India) ड्रॉप इन पिचवर खेळणार आहे. पण या ड्रॉप इन पिचचं परिक्षणच झालं नसल्याची माहिती मेलबर्न क्रिकेट क्लबचे सीईओ स्टुअर्ट फॉक्स यांनी दिली आहे.

    मेलबर्न : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये टीम इंडिया (Team India) ड्रॉप इन पिचवर खेळणार आहे. पण या ड्रॉप इन पिचचं परिक्षणच झालं नसल्याची माहिती मेलबर्न क्रिकेट क्लबचे सीईओ स्टुअर्ट फॉक्स यांनी दिली आहे. याबाबत फॉक्स यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डला मुलाखत दिली. 'ही माझ्यासाठी चिंतेची गोष्ट आहे, कारण आमचा या खेळपट्टीचं परिक्षण करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. आम्ही या खेळपट्टीवर एक परीक्षण मॅच खेळवणार होतो, क्रिकेट व्हिक्टोरियानेही यासाठी आम्हाला समर्थन दिलं होतं. या खेळपट्टीवर आम्ही दोन दिवसांची मॅच खेळवणा होतो, त्यासाठी खेळपट्टीही तयार केली होती. पण एक दिवस आधी ही मॅच रद्द करण्यात आली. दक्षिण ऑस्ट्रेलियात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली,' असं फॉक्स म्हणाले. ड्रॉप इन पिचवर मॅच नाही मेलबर्नमध्ये कोरोना संक्रमणामुळे शेफील्ड शिल्डच्या मॅच एमसीजीऐवजी ऍडलेडमध्ये खेळवल्या गेल्या आणि ऍडलेडमध्ये कोरोना पसरल्यामुळे या आठवड्यात एमसीजीवर होणारी दोन दिवसांची सराव मॅचही रद्द करण्यात आली. आम्हाला या खेळपट्टीवर एक मॅच खेळवायची आहे, त्यासाठी आमचे प्रयत्नही सुरू आहेत, पण याला आता यश येईल असं दिसत नाही, अशी हतबल प्रतिक्रिया फॉक्स यांनी दिली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली बॉक्सिंग डे टेस्ट 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ड्रॉप इन पिच म्हणजे काय? ड्रॉप इन पिच स्टेडियमच्याबाहेर तयार केली जातात आणि मॅचसाठी त्यांना स्टेडियममध्ये बसवलं जातं. अशाप्रकारच्या खेळपट्ट्या ऑस्ट्रेलियामध्ये बऱ्याच कालावधीपासून वापरल्या जात आहेत. अशा खेळपट्ट्यांना मॅचच्या काही दिवस आधी स्टेडियममध्ये आणून लावलं जातं. खेळपट्टीवर गवत आणि मातीचा वापर विरोधी टीमची ताकद आणि कमजोरी बघून ठेवलं जातं. या खेळपट्ट्या पारंपारिक खेळपट्ट्यांसारख्याच असतात. ड्रॉप इन पिचचा वापर न्यूझीलंडमध्येही केला जातो. क्रिकेटचा मोसम नसताना तिकडे पिच हटवून रग्बी खेळली जाते. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे सीरिजला 27 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. तर दुसरी वनडे 29 नोव्हेंबर, तिसरी वनडे 2 डिसेंबरला होईल. 4 डिसेंबरपासून टी-20 सीरिज खेळवली जाईल. दुसरी टी-20 मॅच 6 डिसेंबर आणि तिसरी मॅच 8 डिसेंबरला होईल. यानंतर 17 डिसेंबरपासून टेस्ट सीरिजला सुरुवात होईल. दुसरी टेस्ट 26 डिसेंबर, तिसरी टेस्ट 7 जानेवारी आणि चौथी टेस्ट 15 जानेवारीपासून सुरू होईल.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या