News18 Lokmat

दोन ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने Live सामन्यात टीम इंडियाचा केला अपमान, मयंकची उडवली थट्टा

मयंकने रणजी ट्रॉफीमध्ये जे तिहेरी शतक लगावलं होतं ते कँटिनमध्ये काम करणाऱ्या आणि वेटर्सविरुद्ध लगावलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Dec 26, 2018 02:07 PM IST

दोन ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने Live सामन्यात टीम इंडियाचा केला अपमान, मयंकची उडवली थट्टा

मेलबर्न २६ डिसेंबर २०१८- टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि त्यात तू तू मैं मैं झालं नाही असं तर होऊच शकत नाही. बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दोन माजी खेळाडूंनी लाइव्ह सामन्या दरम्यान मयंक अग्रवालची थट्टा उडवली.


ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटी क्रिकेटपटू कॅरी ओकीफ यांनी मयंकच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, त्याने रणजी ट्रॉफीमध्ये जे तिहेरी शतक लगावलं होतं ते कँटिनमध्ये काम करणाऱ्या आणि वेटर्सविरुद्ध लगावलं होतं.


एवढंच नाही तर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मार्क वॉने भारतीय क्रिकेटचा अपमान केला. मार्क म्हणाला की, भारतात ५० पेक्षा जास्त सरासरी म्हणजे ४० च्या आसपास असते.

Loading...


या दोन्ही ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटवर भारतीय चाहते फार नाराज झाले. काहींनी याला वंशभेदही म्हटले आहे. तसं मार्क वॉ आणि कॅरी ओकीफला मयंकने त्याच्या फलंदाजीने उत्तर दिले. मयंकने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात दमदार ७६ धावा ठोकल्या. १९४७ नंतर तो पहिला असा भारतीय खेळाडू आहे ज्याने ऑस्ट्रिलाच्या जमिनीवर पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक ठोकले. तसेच मयंक ऑस्ट्रेयामधील पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा पहिला खेळाडू झाला आहे.
हे कमी की काय या मालिकेत अर्धशतक साजरं करणारा तो पहिला सलामीवीर आहे. मेलबर्न कसोटीत मयंकने कठीण काळात धीराने फलंदाजी करताना हनुमा विहारीसोबत ४० आणि पुजारासोबत ८० धावांची भागीदारी केली.
VIDEO : खान कुटुंबीयांची ख्रिसमस पार्टी, वाढदिवसाआधी सलमानचा अतरंगी डान्स व्हायरल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2018 02:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...