Home /News /sport /

IND vs AUS : कॅच सोडून विराटने रनआऊट केला, वेडही चक्रावला, पाहा VIDEO

IND vs AUS : कॅच सोडून विराटने रनआऊट केला, वेडही चक्रावला, पाहा VIDEO

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या दुसऱ्या टी-20 वेळी मॅथ्यू वेड (Mathew Wade) याच्या विकेटवरून गोंधळ झाला. विराट कोहली (Virat Kohli) याने वेडचा कॅच सोडला, पण तेव्हाच त्याला रनआऊट केला.

    सिडनी, 6 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टी-20 मध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच (Aron Finch) दुखापतीमुळे खेळत नाही. फिंचच्या ऐवजी मॅथ्यू वेड (Mathew Wade) याच्याकडे ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व देण्यात आलं. ओपनिंगला आलेल्या मॅथ्यू वेडने सुरुवातीपासूनच भारतीय बॉलरवर आक्रमण केलं, पण या मॅचमध्ये तो गोंधळामध्ये आऊट झाला. वॉशिंग्टन सुंदरने टाकलेला आठव्या ओव्हरचा पाचवा बॉल मॅथ्यू वेडच्या बॅटच्या कडेला लागून हवेत गेला, पण विराट कोहली याने अगदी सोपा कॅच सोडला. बॉल हवेत गेल्यानंतर मॅथ्यू वेड धावला, पण विराटने कॅच पकडल्याचं त्याला वाटलं. विराटच्या हातातून कॅच सुटल्याचं वेडच्या लक्षातच आलं नाही. या सगळ्या गोंधळामध्ये वेड नॉन स्ट्रायकरच्या दिशेला पोहोचला होता. विराटने मात्र क्षणाचाही विलंब न करता बॉल विकेट कीपिर केएल राहुलच्या दिशेने फेकला आणि मॅथ्यू वेड रनआऊट झाला. 31 बॉलमध्ये 58 रनची खेळी करून वेड पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या टी-20 मॅचमध्ये 11 रननी विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया दुसरी टी-20 मॅच जिंकून सीरिज खिशात टाकण्याच्या प्रयत्नात असेल. या मॅचमध्ये विजय झाला तर भारत लागोपाठ 10 वनडे मॅच जिंकण्याचं रेकॉर्ड करेल. अफगाणिस्तानच्या नावावर टी-20 मध्ये लागोपाठ 12 आणि लागोपाठ 11 मॅच जिंकण्याचा विक्रम आहे. सध्या भारताने पाकिस्तानच्या लागोपाठ 9 टी-20 विजयाच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. या मॅचमध्ये विजय मिळवला तर भारतीय टीम पाकिस्तानचा रेकॉर्ड मोडेल.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या