Home /News /sport /

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात Romantic क्षण, स्टेडियममध्येच त्याने प्रपोज केलं!

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात Romantic क्षण, स्टेडियममध्येच त्याने प्रपोज केलं!

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या दुसऱ्या वनडेवेळी दर्शकांना वेगळंच चित्र पाहायला मिळालं. मॅच सुरू असताना सिडनीच्या स्टेडियममध्ये बसलेल्या एका प्रेक्षकाने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं.

    सिडनी, 29 नोव्हेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या दुसऱ्या वनडेवेळी दर्शकांना वेगळंच चित्र पाहायला मिळालं. मॅच सुरू असताना सिडनीच्या स्टेडियममध्ये बसलेल्या एका प्रेक्षकाने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. या व्यक्तीने मुलीला अंगठी देऊन तिला मागणी घातली. मुलीनेही त्याने दिलेली ही अंगठी स्वीकारली आणि मग एकमेकांनी दोघांना मिठी मारली. प्रपोज करणाऱ्या व्यक्तीने टीम इंडियाची जर्सी घातली होती, तर मुलगी पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घालून स्टेडियममध्ये आली होती, त्यामुळे मुलगा भारतीय तर मुलगी ऑस्ट्रेलियाची असल्याचं बोललं जात आहे, पण याबाबत अजून अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मॅच सुरू असताना हा मुलगा जेव्हा मुलीला प्रपोज करत होता तेव्हा प्रक्षेपण करणाऱ्या चॅनलनेही ही दृष्यं लाईव्ह दाखवली. मुलाने केलेलं हे अनोखं प्रपोज अवघ्या काही क्षणांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालं. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या मॅचवेळी 20 ओव्हर झाल्या तेव्हा स्टेडियममधल्या प्रेक्षकांना आणि जगात टीव्हीवर मॅच बघत असणाऱ्या सगळ्यांनी हे दृष्यं पाहिलं. मुलीने अंगठी स्वीकारल्यानंतर तिकडे बसलेल्या प्रेक्षकांनीही टाळ्या वाजवत दोघांचंही अभिनंदन केलं. कोरोना व्हायरसमुळे याआधीचे अनेक सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात आले. पण भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलिया सरकारने संख्या ठरवून प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या