IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीआधी टीम इंडियाची जिममध्ये कसून मेहनत

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीआधी टीम इंडियाची जिममध्ये कसून मेहनत

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दौऱ्यासाठी टीम इंडिया (Team India) जोरदार तयारी करत आहे. टीम इंडियाच्या या तयारीचा व्हिडिओ केएल राहुल (KL Rahul) याने सोशल मीडियावर शेयर केला आहे.

  • Share this:

सिडनी, 22 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दौऱ्यासाठी टीम इंडिया (Team India) जोरदार तयारी करत आहे. टीम इंडियाच्या या तयारीचा व्हिडिओ केएल राहुल (KL Rahul) याने सोशल मीडियावर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे खेळाडू जिममध्ये घाम गाळत असल्याचं दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे यावर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएल (IPL 2020) मध्ये केएल राहुल शानदार फॉर्ममध्ये होता. आयपीएल संपल्यानंतर ऑस्ट्रेलियात गेल्यावरही राहुल तेवढीच मेहनत घेताना दिसत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. 27 नोव्हेंबरपासून वनडे सीरिजला सुरुवात होईल. तर दुसरी वनडे 29 नोव्हेंबरला, तिसरी वनडे 2 डिसेंबरला होईल. यानंतर 4 डिसेंबरला पहिली टी-20, 6 डिसेंबरला दुसरी टी-20 आणि 8 डिसेंबरला तिसरी टी-20 खेळवली जाईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टेस्ट सीरिजला 17 डिसेंबरपासून सुरूवात होईल. ऍडलेडमध्ये होणारी पहिली टेस्ट डे-नाईट असेल. यानंतर दुसरी टेस्ट मॅच 26 डिसेंबरपासून, तिसरी टेस्ट 7 जानेवारीपासून आणि चौथी टेस्ट 15 जानेवारीपासून होईल.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली सीरिज सुरू व्हायला एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी बाकी असताना राहुलने हा व्हिडिओ शेयर करून टीमच्या तयारीबाबत माहिती दिली. या व्हिडिओमध्ये टीमचे खेळाडू सपोर्ट स्टाफच्या देखरेखीखाली व्यायाम करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या त्याचे सिक्स पॅक ऍब्स दाखवत आहे. बऱ्याच कालावधीनंतर आम्ही एकत्र ग्रुप ट्रेनिंग सेशन केलं, असं राहुल म्हणाला.

आयपीएलच्या या मोसमात पंजाब (KXIP) चा कर्णधार असलेल्या राहुलने सर्वाधिक 670 रन केले होते, त्यामुळे त्याला ऑरेंज कॅपही मिळाली होती. या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या तिन्ही फॉरमॅटसाठी त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली.

विराटची ऑस्ट्रेलियात कसरत, जिममध्ये गाळतोय घाम, पाहा PHOTO

यावर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौऱ्यातही राहुलने उत्तम कामगिरी केली. 5 मॅचच्या या सीरिजमध्ये भारताचा 5-0ने विजय झाला. वनडे सीरिजमध्येही राहुलने उल्लेखनीय कामगिरी केली, पण वनडे सीरिजमध्ये भारताचा 3-0 ने पराभव झाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे सीरिजसाठी राहुल शिखर धवनसोबत तसंच टी-20 सीरिजमध्ये मयंक अग्रवालसोबत ओपनिंगला खेळण्याची शक्यता आहे.

Published by: Shreyas
First published: November 22, 2020, 7:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या