IND vs AUS : राहुलने मैदानातच ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला छेडलं, पाहा VIDEO
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या वनडे सीरिजची दुसरी वनडे सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झाली. मॅचदरम्यान केएल राहुल (KL Rahul) आणि एरॉन फिंच (Aron Finch) यांच्यामध्ये मस्करीचे काही क्षण बघायला मिळाले.
सिडनी, 29 नोव्हेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या वनडे सीरिजची दुसरी वनडे सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झाली. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर फिंच आणि वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलियाला 142 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. मॅचदरम्यान केएल राहुल (KL Rahul) आणि एरॉन फिंच यांच्यामध्ये मस्करीचे काही क्षण बघायला मिळाले.
भारताचा फास्ट बॉलर नवदीप सैनी याने टाकलेला बॉल एरॉन फिंचच्या पोटाला लागला. सैनीने टाकलेला हा नो बॉल होता. बॉल पोटाला लागल्यानंतर फिंचला दुखत होतं, त्यामुळे त्याने थोडी विश्रांती घेतली.
फिंच विश्रांती घेत असतानाच केएल राहुल त्याच्याजवळ आला. राहुलने फिंचच्या पोटाला हात लावत त्याला छेडण्याचा प्रयत्न केला, पण फिंचने राहुलचा हात ढकलला. ही मस्ती करत असताना दोघंही हसत होते. मॅचमधले हे काही मजेशीर क्षण लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाले. या मॅचमध्ये फिंचने 60 आणि वॉर्नरने 83 रन केले, तर स्मिथने आणखी एक शतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या पाचही बॅट्समननी अर्धशतकाच्यावर खेळी केली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सामन्यादरम्यान बहुतेकवेळा स्लेजिंग आणि मैदानातली वादावादी बघायला मिळते, पण आयपीएलमध्ये दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये मैत्री झाल्याचं दिसत आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.