विराटने घेतली पितृत्वाची रजा, कपिल देव यांनी दिलं गावसकरांचं उदाहरण

ऑस्ट्रेलिया दौरा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) च्या पितृत्वाच्या रजेमुळे चर्चेत आला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनीही याबाबतचं आपलं मत मांडलं.

ऑस्ट्रेलिया दौरा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) च्या पितृत्वाच्या रजेमुळे चर्चेत आला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनीही याबाबतचं आपलं मत मांडलं.

  • Share this:
    नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : भारतीय टीम (Team India) चा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू व्हायला आता आठवड्यापेक्षा कमी कालावधी बाकी आहे. हा दौरा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) च्या पितृत्वाच्या रजेमुळे चर्चेत आला आहे. आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीम या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचली. या दौऱ्यात विराट तीन वनडे, तीन टी-20 मॅचची सीरिज आणि पहिली टेस्ट मॅच खेळून भारतात परतणार आहे. सीरिजच्या उरलेल्या तीन टेस्ट मॅचमध्ये विराट दिसणार नाही. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट दौरा अर्धवट सोडणार आहे. विराटच्या या निर्णयाला अनेक क्रिकेटपटूंनी पाठिंबा दिला. भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनीही याबाबतचं आपलं मत मांडलं. हिंदुस्तान टाईम्स लीडरशीप समिटमध्ये कपिल देव वरिष्ठ क्रीडा पत्रकार अय्याझ मेनन यांच्याशी बोलत होते. या मुद्द्यावर जास्त लक्ष द्यायची गरज नाही, आपण विराटच्या या निर्णयाचं स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया कपिल देव यांनी दिली. 'आपण जाऊन परत येऊ शकतो, असा विचार करू नका. सुनिल गावसकर कित्येक महिने आपल्या मुलाला पाहू शकले नव्हते. ती वेगळी गोष्ट आहे, पण आता गोष्टी बदलल्या आहेत. कोहलीच्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा तो क्रिकेट खेळत होता. आज तो मुलासाठी सुट्टी घेत आहे. तुम्ही असं करू शकता, त्यात गैर काहीच नाही. तेव्हा आणि आता गोष्टी बदलल्या आहेत. सध्या मिळत असलेल्या सुविधांमुळे खेळाडूंना आराम मिळतो, त्यावेळी आम्ही याचा विचारही करू शकत नव्हतो,' असं कपिल देव म्हणाले. 'तुम्ही विमान विकत घेऊन तीन दिवसांमध्ये जाऊन परत येऊ शकता. मला याचा आनंद आणि अभिमान आहे की खेळाडू या स्तरावर पोहोचले आहेत. मी विराटसाठी खूश आहे, कारण तो त्याच्या कुटुंबाला बघण्यासाठी परत जात आहे. विराटला क्रिकेटबद्दल प्रेम आहे, पण वडिल होण्याचा आनंद वेगळाच आहे,' अशी प्रतिक्रिया कपिल देव यांनी दिली.
    Published by:Shreyas
    First published: