IND vs AUS : बॉलिंगसाठी नाही तर या कारणासाठी बुमराहला ड्रेसिंग रूममध्ये मिळाला 'गार्ड ऑफ ऑनर'
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यामध्ये भारताच्या (India vs Australia) बॅट्समननी निराशाजनक कामगिरी केली, पण जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने अर्धशतकी खेळी करून भारताची लाज राखली.
सिडनी, 11 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यामध्ये भारताचा (India vs Australia) 194 रनवर ऑलआऊट झाला. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या भारताच्या बॅट्समननी निराशाजनक कामगिरी केली. दहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने भारताकडून सर्वाधिक रनची खेळी केली. 57 बॉलमध्ये 55 रनकरून बुमराह आऊट झाला. बुमराहच्या खेळीमध्ये 6 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. बुमराहच्या या खेळीने भारताची लाज राखली आणि 194 पर्यंत मजल मारता आली.
जसप्रीत बुमराह याने सिक्स मारत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. इनिंग संपल्यानंतर बुमराह जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये गेला, तेव्हा भारतीय खेळाडूंनी बुमराहला त्याच्या बॅटिंगबद्दल गार्ड ऑफ ऑनर दिला.
Jasprit Bumrah brings up his maiden first-class 50!
जसप्रीत बुमराह याची टेस्टमधली बॅटिंग सरासरी 3 एवढीच आहे. अनेकांनी बुमराहच्या या कामगिरीची तुलना ग्लेन मॅकग्राने काही वर्षांपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या अर्धशतकाशी केली आहे.