IND vs AUS : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या आणखी एका खेळाडूला 'जखमी' केलं

IND vs AUS : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या आणखी एका खेळाडूला 'जखमी' केलं

खेळाडूंच्या दुखापतीने त्रस्त झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या (India vs Australia) टीमच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सराव सामन्यादरम्यान फास्ट बॉलर हॅरी कॉनवे (Harry Conway) याला दुखापत झाली आहे.

  • Share this:

सिडनी, 12 डिसेंबर : खेळाडूंच्या दुखापतीने त्रस्त झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या (India vs Australia) टीमच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सराव सामन्यादरम्यान फास्ट बॉलर हॅरी कॉनवे (Harry Conway) याला दुखापत झाली आहे. कनकशन (डोक्याला दुखापत) मुळे हॅरी कॉनवे सराव सामन्याच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये खेळणार नाही. कॉनवेच्याऐवजी मार्क स्टीकेटी याची कनकशन सबस्टिट्युट म्हणून निवड झाली आहे.

अकराव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या कॉनवेला भारताच्या फास्ट बॉलरनी बाऊन्सर टाकून हैराण केलं. कॉनवेला पहिल्या दिवसाच्या शेवटी डोक्याला बॉल लागला. याआधी कॅमरन ग्रीन आणि विल पुकोवस्की यांनाही भारताविरुद्धच्या सराव सामन्यात डोक्याला बॉल लागले.

शुक्रवारी जसप्रीत बुमराहने मारलेला स्ट्रेट ड्राईव्हचा बॉल बॉलिंग करत असलेल्या कॅमरुन ग्रीनच्या डोक्याला लागला. यानंतर ग्रीन मैदानाबाहेर गेला. हॅरी कॉनवे याला कनकशनची लक्षणं उशिरा जाणवायला लागली. याआधी पहिल्या सराव सामन्यात कार्तिक त्यागीने टाकलेला बॉल पुकोवस्कीच्या डोक्याला लागला.

व्हिक्टोरियाच्या मार्कस हॅरिस याला भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियन टीममध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. तर डेव्हिड वॉर्नर आणि विल पुकोवस्की दुखापतीमुळे बाहेर आहेत. हे दोघं 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉक्सिंग डे टेस्टसाठी उपलब्ध असतील, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितलं आहे.

Published by: Shreyas
First published: December 12, 2020, 2:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या