IND vs AUS : ऑस्ट्रेलियात हा खेळाडू घेऊ शकतो विराटची जागा, हरभजनचं मत

भारतीय क्रिकेट टीम (Team India) सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा दौरा अर्धवट सोडून भारतात परतणार आहे. हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने विराटच्या बदली खेळाडूचं नाव सांगितलं आहे.

भारतीय क्रिकेट टीम (Team India) सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा दौरा अर्धवट सोडून भारतात परतणार आहे. हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने विराटच्या बदली खेळाडूचं नाव सांगितलं आहे.

  • Share this:
    मुंबई, 22 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट टीम (Team India) सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. 27 नोव्हेंबरपासून वनडे सीरिजने या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या दौऱ्यात तीन वनडे, तीन टी-20 आणि एक टेस्ट मॅच खेळणार आहे. टेस्ट सीरिजच्या उरलेल्या तीन मॅच न खेळताच विराट भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडणार आहे. त्यामुळे विराट गेल्यानंतर टीम इंडियासाठी पर्याय कोण, याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानेही याबाबतचं आपलं मत वर्तवलं आहे. केएल राहुल (KL Rahul) विराट कोहलीला उरलेल्या तीन टेस्ट मॅचसाठी पर्याय असू शकतो. राहुल विराटच्या जागी चौथ्या क्रमांकावर खेळणं योग्य राहिल, असं हरभजन म्हणाला आहे. 'मी ओपनिंगची जोडी बदलणार नाही. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियात इनिंगची सुरूवात केली पाहिजे. राहुल कोहलीची जागा भरू शकतो. राहुल तिसरा, चौथा आणि ओपनिंगसाठी सर्वोत्तम पर्याय आहे,' असं हरभजन इंडिया टुडेशी बोलताना म्हणाला. 'गुलाबी बॉल सुरुवातीला जास्त हलतो, पण एकदा सीम बसली की बॅटिंग करणं सोपं होतं. भारताचे बॉलर गुलाबी बॉलने बॉलिंग करण्यासाठी उत्सुक असतील, कारण भारताचं बॉलिंग आक्रमण चांगलं आहे. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि इतर बॉलर ऑस्ट्रेलियाला नुकसान पोहोचवू शकतात,' असं वक्तव्य हरभजनने केलं. टी-20 टीम विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन वनडे टीम विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, संजू सॅमसन टेस्ट टीम विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान सहा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव,रविंद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज
    Published by:Shreyas
    First published: