IND vs AUS : मॅकग्रा म्हणतो, विराटच्या अनुपस्थितीमध्ये या खेळाडूला सिद्ध करण्याची संधी

IND vs AUS : मॅकग्रा म्हणतो, विराटच्या अनुपस्थितीमध्ये या खेळाडूला सिद्ध करण्याची संधी

भारतीय क्रिकेट टीमच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 27 नोव्हेंबरला वनडे सीरिजपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) वनडे, टी-20 सीरिज आणि टेस्ट सीरिजमधली पहिली टेस्ट खेळल्यानंतर भारतात परतणार आहे.

  • Share this:

सिडनी, 17 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट टीमच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 27 नोव्हेंबरला वनडे सीरिजपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) वनडे, टी-20 सीरिज आणि टेस्ट सीरिजमधली पहिली टेस्ट खेळल्यानंतर भारतात परतणार आहे. 17 डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरू होणारी डे-नाईट टेस्ट विराटची दौऱ्यातील शेवटची टेस्ट असेल. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे तो भारतात परतणार आहे. त्यामुळे उरलेल्या तिन्ही टेस्ट भारत विराटशिवाय खेळेल.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी असल्याचं मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ग्लेन मॅकग्राने मांडलं आहे. 'विराट नसल्यामुळे सीरिजच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. कोहली भारतात परतल्यानंतर भारताला त्यांच्या खेळायचा स्तर वाढवावा लागेल. उरलेल्या तीन टेस्ट मॅचमध्ये खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे,' असं मॅकग्रा म्हणाला.

'रोहित शर्मा विराटच्या अनुपस्थितीमध्ये ऑस्ट्रेलियाशी सामना करु शकतो. रोहित उत्तम खेळाडू आहे, पण तुम्ही फक्त एका खेळाडूवर अलंबून राहू शकत नाही. तुमच्याकडे अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल यांच्यासारखे बॅट्समन लाईनमध्ये आहेत. विराट गेल्यानंतर या सगळ्यांकडे छाप पाडण्याची संधी आहे,' अशी प्रतिक्रिया मॅकग्राने दिली.

'भारत विराटच्या अनुपस्थितीमध्ये तीन टेस्ट खेळेल, तर वनडे आणि टी-20 सीरिजमध्ये रोहित खेळणार नाही, या दोघांची कमी भारतीय टीम नक्कीच जाणवेल,' असं वक्तव्य मॅकग्राने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना केलं आहे. रोहित शर्माच्या मांडीला दुखापत झाल्यामुळे त्याला वनडे आणि टी-20 सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. युएईमध्ये आयपीएल दरम्यान रोहितला दुखापत झाली होती.

Published by: Shreyas
First published: November 17, 2020, 10:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading