IND vs AUS : रोहित नसताना भारताचा हा खेळाडू ठरेल मॅच विनर! मॅक्सवेलला भीती

IND vs AUS : रोहित नसताना भारताचा हा खेळाडू ठरेल मॅच विनर! मॅक्सवेलला भीती

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या सीरिजला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) ची गैरहजेरी ऑस्ट्रेलियासाठी चांगली गोष्ट असल्याचं ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) म्हणाला आहे.

  • Share this:

सिडनी.21 नोव्हेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या सीरिजला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया (Team India) तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. वनडे सीरिजपासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होईल, पण वनडे आणि टी-20 मध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळणार नाही. रोहित शर्माची गैरहजेरी ऑस्ट्रेलियासाठी चांगली गोष्ट असल्याचं ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) म्हणाला आहे. रोहित शर्मा भारताच्या टीममध्ये नसला तर केएल राहुल (KL Rahul) रोहितची जागा घेण्यासाठी सक्षम आहे, असं मॅक्सवेलला वाटतं. रोहित नसल्यामुळे राहुलला वनडे आणि टी-20 टीमचं उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. आयपीएलदरम्यान रोहितच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती.

'रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आहे. ओपनर म्हणून रोहितने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकंही केली आहेत. त्यामुळे रोहितचं नसणं आमच्यासाठी चांगलंच आहे. पण राहुलही चांगला खेळाडू आहे. तो रोहितची भूमिका निभावू शकतो.आयपीएलमध्ये आपण राहुलची कामगिरी बघितली, ओपनिंग करो अथवा न करो तो उत्कृष्ट खेळाडू आहे.' असं मॅक्सवेल सीरिजचं प्रसारण करणाऱ्या सोनी सोबत बोलताना म्हणाला.

आयपीएलमध्ये मॅक्सवेल, राहुल आणि मयंक अग्रवाल पंजाबकडून खेळले होते. मॅक्सवेलने राहुलसोबतच मयंकचंही कौतुक केलं आहे. 'राहुल आणि मयंक उत्कृष्ट खेळाडू आहेत. ते विकेटच्या चारही बाजूने रन काढतात, तसंच त्यांच्या कमोजीरही कमी आहेत,' अशी प्रतिक्रिया मॅक्सवेलने दिली.

ऑस्ट्रेलियाचं फास्ट बॉलिंग आक्रमण नक्कीच त्यांना रोखेल, असा विश्वास मॅक्सवेलने व्यक्त केला. वनडे क्रिकेट टी-20 क्रिकेटच्या तुलनेत थोडं वेगळं आहे. आमची बॉलिंग भारतीय टीमला दबावात टाकेल. खेळपट्टीमधील उसळी आणि मोठ्या मैदानांमुळे आम्हाला मदत मिळेल, अशी अपेक्षा मॅक्सवेलला आहे.

Published by: Shreyas
First published: November 21, 2020, 9:05 AM IST
Tags:

ताज्या बातम्या