IND vs AUS : स्विच हिटचा वाद, मॅक्सवेलने दिलं चॅपलना प्रत्युत्तर

IND vs AUS : स्विच हिटचा वाद, मॅक्सवेलने दिलं चॅपलना प्रत्युत्तर

भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलिया (India vs Australia) च्या ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) त्याच्या स्विच हिट (Switch Hit) मुळे वादात सापडला. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयन चॅपल (Ian Chappell) यांनी मॅक्सवेलचा हा शॉट बेकायदेशीर असल्याची टीका केली.

  • Share this:

कॅनबेरा, 3 डिसेंबर : भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलिया (India vs Australia) च्या ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) ची बॅट चांगलीच चमकली. पण या सीरिजमध्ये खेळलेल्या स्विच हिट (Switch Hit) मुळे मॅक्सवेल वादात सापडला. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयन चॅपल (Ian Chappell) यांनी मॅक्सवेलचा हा शॉट बेकायदेशीर असल्याची टीका केली, तसंच या शॉटवर बंदी घालण्याची मागणीही चॅपल यांनी केली.

आता मॅक्सवेल याने चॅपल यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 'स्विच हिट खेळ नियमांच्या अंतगर्त आहे. बॅटिंग अशाचप्रकारे विकसित झाली आहे. वेळेनुसार बॅटिंग चांगल्याहून अधिक चांगली होत गेली. त्यामुळेच मोठे स्कोअर होत आहेत आणि या मोठ्या आव्हानांचा पाठलागही केला जात आहे. बॉलरनी याविरुद्ध रणनीती आखावी,' अशी प्रतिक्रिया मॅक्सवेलने दिली.

काय म्हणाले होते चॅपल?

'स्विच हिटिंग हे कौशल्य आहे, असा शॉट पाहून मलाही आश्चर्य वाटतं, पण हे योग्य नाही. जेव्हा अंपायर बॉलरना कशी बॉलिंग करायची हे सांगतात, मग बॅट्समनलाही स्विच हिट खेळू शकत नाही, असं सांगितलं गेलं पाहिजे. स्विच हिटिंगला बेकायदेशीर घोषित केलं गेलं पाहिजे. मॅक्सवेल आणि वॉर्नरनेही या सीरिजमध्ये स्विच हिट मारले. जर बॅट्समन शॉट मारायच्या आधी हाताची जागा बदलत असेल तर ते बेकायदेशीर आहे, असं माझं म्हणणं आहे,' असं चॅपल म्हणाले होते.

Published by: Shreyas
First published: December 3, 2020, 5:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या