IND vs AUS : वर्ल्ड कपची चूक पुन्हा नको, याला सहाव्या क्रमांकावर खेळवा, गंभीरचा सल्ला

IND vs AUS : वर्ल्ड कपची चूक पुन्हा नको, याला सहाव्या क्रमांकावर खेळवा, गंभीरचा सल्ला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा (India vs Australia) 66 रननी पराभव झाला. भारताकडे सहावा बॉलर नसणं पराभवाचं मोठं कारण असल्याचं मत गौतम गंभीर (Gautam Gambhir) ने मांडलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा (India vs Australia) 66 रननी पराभव झाला. भारताच्या या मोठ्या पराभवाची माजी क्रिकेटपटू समिक्षा करत आहेत. भारताकडे सहावा बॉलर नसणं पराभवाचं मोठं कारण असल्याचं मत गौतम गंभीर (Gautam Gambhir) ने मांडलं आहे. टीम इंडियाला (Team India) लवकरच या समस्येतून मार्ग काढावा लागणार आहे. मागच्यावर्षी वर्ल्ड कपमध्ये केलेली चूक त्यांनी पुन्हा करू नये, असं गंभीर म्हणाला.

'आज आपण 2023 वर्ल्ड कपच्या तयारीबाबत बोलत आहोत, पण यासाठी पर्याय शोधणं गरजेचं आहे. 2019 साली केलेली चूक पुन्हा करू शकत नाही. मागच्या वर्ल्ड कपमध्ये तुमचं टीम कॉम्बिनेशन सर्वोत्तम नव्हतं. जर हार्दिक पांड्या बॉलिंग करत नसेल, तर आपल्याला पर्याय शोधणं गरजेचं आहे. टीमला टॉप-6 मध्ये बॅटिंग करणारा आणि 6-8 ओव्हर बॉलिंग करणाऱ्या खेळाडूची गरज आहे,' असं वक्तव्य गंभीरने इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना केलं.

वॉशिंग्टन सुंदरला संधी

सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी गंभीरने वॉशिंग्टन सुंदर (Washington Sunder) याचं नाव घेतलं आहे. 'वॉशिंग्टन सुंदरला तुम्ही सहाव्या क्रमांकावर खेळवू शकता. केएल राहुल चौथ्या क्रमांकावर खेळेल. सुंदर पांड्या आणि जडेजासोबत बॅटिंग करू शकतो. सुंदर नव्या बॉलनेही बॉलिंग करू शकतो. तसंच दोन डावखुरे बॅट्समन खेळत असतील तर सुंदर बॉलिंगसाठीही योग्य ठरेल. टीममध्ये ऑलराऊडंर फास्ट बॉलरच असणं गरजेचं नाही. विजय शंकर फिट नाही, त्यामुळे मी वॉशिंग्टन सुंदरला टीममध्ये स्थान दिलं असतं,' अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली.

Published by: Shreyas
First published: November 28, 2020, 12:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या