मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS : वनडे सीरिज उद्यापासून सुरू, विराटपुढे ही 5 आव्हान

IND vs AUS : वनडे सीरिज उद्यापासून सुरू, विराटपुढे ही 5 आव्हान

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला उद्यापासून सुरूवात होत आहे. एवढ्या महिन्यानंतर पुनरागमन करत असल्यामुळे टीम इंडिया (Team India) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुढे नवी आव्हानं उभी ठाकली आहेत.

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला उद्यापासून सुरूवात होत आहे. एवढ्या महिन्यानंतर पुनरागमन करत असल्यामुळे टीम इंडिया (Team India) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुढे नवी आव्हानं उभी ठाकली आहेत.

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला उद्यापासून सुरूवात होत आहे. एवढ्या महिन्यानंतर पुनरागमन करत असल्यामुळे टीम इंडिया (Team India) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुढे नवी आव्हानं उभी ठाकली आहेत.

सिडनी, 26 नोव्हेंबर : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला उद्यापासून सुरूवात होत आहे. सिडनीमध्ये या दोन्ही टीम पहिली मॅच खेळणार आहेत. दोन महिन्यांच्या या दौऱ्याला वनडे सीरिजपासून सुरुवात होणार आहे. 9 महिन्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. कोरोना व्हायरसमुळे भारतीय टीम मैदानात उतरली नव्हती. एवढ्या महिन्यानंतर पुनरागमन करत असल्यामुळे टीम इंडिया (Team India) पुढे नवी आव्हानं उभी ठाकली आहेत.

रोहितची अनुपस्थिती

वनडे क्रिकेटच्या इतिहासात रोहित शर्मा (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने कांगारूंविरुद्ध वनडेमध्ये आतापर्यंत 2,208 रन केले आहेत. याआधी जानेवारी महिन्यात दोन्ही टीममध्ये झालेल्या वनडे सीरिजवेळीही रोहित शर्माने शतकी खेळी केली होती. पण दुखापतीमुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला गेला नाही. या महत्त्वाच्या सीरिजमध्ये विराटला रोहितची कमी नक्कीच जाणवेल.

स्मिथ-वॉर्नरचं पुनरागमन

डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथचं ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये पुनरागमन झाल्यामुळे त्यांची बॅटिंग मजबूत झाली आहे. या बॅटिंगचा सामना करण्यासाठी भारतीय बॉलरना कठोर मेहनत करावी लागणार आहे. डेव्हिड वॉर्नरची भारताविरुद्धची कामगिरीही उल्लेखनीय राहिली आहे. वॉर्नरने भारताविरुद्ध 19 मॅचमध्ये 49.29 च्या सरासरीने 838 रन केले, यामध्ये तीन शतकांचा समावेश आहे. वॉर्नर वनडे क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध एकदाही शून्यवर आऊट झालेला नाही.

ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास

9 महिन्यानंतर भारतीय टीम मैदानात पुनरागमन करणार आहे, तर ऑस्ट्रेलियाने शेवटची वनडे सीरिज इंग्लंडविरुद्ध सप्टेंबरमध्ये खेळली. बराच काळ क्रिकेटपासून लांब नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाला याचा फायदा होईल. इंग्लंडविरुद्धच्या त्या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने विजय झाला होता.

मजबूत बॅटिंग

ऑस्ट्रेलियाकडे वॉर्नर, फिंच, स्मिथ, लाबुशेन, स्टॉयनिस, मॅक्सवेल आणि कमिन्सपर्यंत बॅटिंग आहे, त्यामुळे बुरमाह आणि शमी या फास्ट बॉलरनाही ऑस्ट्रेलियाची बॅटिंग तगडं आव्हान उभं करेल.

मिचेल स्टार्क

टी-20 वर्ल्ड कपची तयारी करण्यासाठी मिचेल स्टार्कने आयपीएलमधून माघार घेतली होती. पण कोरोनामुळे टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात आला, त्यामुळे मिचेल स्टार्कही विश्रांतीनंतर पुनरागमन करत आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही स्टार्क फॉर्ममध्ये होता. शेफिल्ड शील्डमध्येही बॉलिंग आणि बॅटिंगमध्येही स्टार्कने चांगली कामगिरी केली.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

27 नोव्हेंबर- पहिली वनडे- सिडनी

29 नोव्हेंबर- दुसरी वनडे, सिडनी

2 डिसेंबर- तिसरी वनडे, मनुका ओव्हल

First published:
top videos