Home /News /sport /

IND vs AUS : 12 वर्षात पहिल्यांदाच विराटच्या नावावर झाला लाजिरवाणा विक्रम

IND vs AUS : 12 वर्षात पहिल्यांदाच विराटच्या नावावर झाला लाजिरवाणा विक्रम

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ऑस्ट्रेलिया (India vs Australia) विरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये 63 रन करून आऊट झाला.

    कॅनबेरा, 2 डिसेंबर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ऑस्ट्रेलिया (India vs Australia) विरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये 63 रन करून आऊट झाला. जॉस हेजलवूडने विराटला माघारी पाठवलं. तीन मॅचच्या या वनडे सीरिजमध्ये तिन्ही वेळा हेजलवूडनेच विराटची विकेट घेतली. पदार्पणानंतर पहिल्यांदाच विराट कोहलीला वनडेमध्ये एकही शतक न लगावता वर्ष संपवावं लागलं आहे. ही टीम इंडियाची या वर्षातली शेवटची वनडे मॅच होती. मागच्या मॅचमध्ये विराट कोहली शतकाच्या जवळ पोहोचला होता, पण 89 रनवर विराट आऊट झाला होता. 2008 साली विराटने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर प्रत्येक वर्षी विराटने शतक केलं आहे. 2017 आणि 2018 साली त्याने सर्वाधिक शतकं केली होती. 2017 साली त्याने 26 इनिंगमध्ये आणि 2018 साली 14 इनिंगमध्ये 6-6 शतकं केली होती. वनडे क्रिकेटमध्ये कोहलीची शतकं 2008 - 0 2009 - 1 2010 - 3 2011 - 4 2012 - 5 2013 - 4 2014 - 4 2015 - 2 2016 - 3 2017 - 6 2018 - 6 2019 - 5 2020 - 0 कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारतातल्या वनडे सीरिजपासून वर्षाची सुरुवात केली होती. यानंतर टीम न्यूझीलंड दौऱ्यावर गेली, मग कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट बंद होतं. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या तीन वनडेमध्येही विराटला शतक करता आलं नाही. याच मॅचमध्ये विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 12 हजार रन करणारा खेळाडू ठरला. विराटने सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडला. 13व्या ओव्हरमध्ये सिन एबॉटच्या बॉलिंगवर एक रन काढत 12 हजार वनडे रनचा टप्पा ओलांडला. 242 इनिंगमध्येच विराटने ही कामगिरी केली, तर सचिनला हा विक्रम करायला 300 इनिंग लागल्या होत्या.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या