IND vs AUS : विराट मोडणार पॉण्टिंगचा विश्वविक्रम! ऍडलेडमध्ये इतिहास घडणार

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टेस्ट सीरिजला उद्यापासून (17 डिसेंबर) सुरूवात होत आहे. या मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) कडे रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) याचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टेस्ट सीरिजला उद्यापासून (17 डिसेंबर) सुरूवात होत आहे. या मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) कडे रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) याचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

  • Share this:
    ऍडलेड, 16 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टेस्ट सीरिजला उद्यापासून (17 डिसेंबर) सुरूवात होत आहे. याआधीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने ऐतिहासिक कामगिरी केली होती. 2018-19 साली भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने धूळ चारली होती. हा विक्रम करणारा विराट कोहली (Virat Kohli) फक्त भारताचाच नाही तर आशियाचाही पहिला कर्णधार बनला होता. आता पहिल्या मॅचमध्ये विराटकडे रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) चा विक्रम मोडण्याची संधी आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली पहिली टेस्ट मॅच डे-नाईट असल्यामुळे गुलाबी बॉलने खेळवण्यात येईल. या मॅचमध्ये विराटने शतक केलं तर तो कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं करण्याचा पॉण्टिंगचा विक्रम मोडेल. विराट कोहली आणि रिकी पॉण्टिंग यांच्या नावावर सध्या 41-41 आंतरराष्ट्रीय शतकं आहेत. कोहलीने 187 मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं, तर रिकी पॉण्टिंगने 324 मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद भुषवलं. ऍडलेडमध्ये एक शतक केलं, तर विराट पॉण्टिंगच्या पुढे निघून जाईल. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅम स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्मिथने 286 मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करत 31 शतकं केली. तर स्टीव्ह स्मिथ याने 20 शतकं केल्यामुळे तो चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा मायकल क्लार्क आणि वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा 19-19 शतकांसह संयुक्तरित्या पाचव्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतकं केली आहेत. पण 2020 साली त्याला एकही शतक करता आलं नाही. त्यामुळे ऍडलेड टेस्टमध्ये शतक करून विराट वर्षाचा शेवट गोड करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पहिली टेस्ट संपल्यानंतर विराट कोहली भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट हा दौरा अर्धवट सोडून परतणार आहे.
    Published by:Shreyas
    First published: