Home /News /sport /

IND vs AUS : ऍडलेड टेस्टमध्ये विराटला सचिन-लाराचे दोन विक्रम मोडण्याची संधी

IND vs AUS : ऍडलेड टेस्टमध्ये विराटला सचिन-लाराचे दोन विक्रम मोडण्याची संधी

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) ला सुरुवात झाली आहे. पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहली (Virat Kohli) कडे ब्रायन लारा (Brian Lara) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

पुढे वाचा ...
    ऍडलेड, 17 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) ला सुरुवात झाली आहे. परदेशातला भारताचा हा गुलाबी बॉलने होणारा पहिलाच सामना आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी हा सामना तितकाच महत्त्वाचा आहे. यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातला विराटचा हा शेवटचा सामना आहे. या मॅचनंतर विराट भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट हा दौरा अर्धवट सोडणार आहे. ऍडलेडमधल्या पहिल्या टेस्टमध्ये विराटकडे ब्रायन लारा (Brian Lara) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. ऍडलेडच्या मैदानात पाहुण्या खेळाडूकडून सर्वाधिक रन करण्याचा विक्रम ब्रायन लाराच्या नावावर आहे. लाराने या मैदानात एकूण 610 रन केल्या आहेत. हे रेकॉर्ड मोडण्यापासून विराट कोहली 179 रन लांब आहे. लाराचा हा विक्रम मोडण्यासाठी विराटला दोन्ही इनिंगमध्ये मिळून 179 रन करावे लागतील. लाराने ऍडलेडच्या मैदानात 4 मॅच खेळल्या. यात त्याने 76.25 च्या सरासरीने दोन शतकं आणि 610 रन केले आहेत. तर कोहलीने इकडे 71.83 च्या सरासरीने 431 रन केले आहेत. या मैदानात कोहलीच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये तीन शतकं आहेत. याशिवाय विराट कोहली सचिनचा विक्रम तोडण्यापासून एक शतक दूर आहे. तेंडुलकरच्या नावावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक 6 शतकं करण्याचा विक्रम आहे. सचिनने ऑस्ट्रेलियामध्ये 53.2 च्या सरासरीने 1,809 रन केले आहेत. तर कोहलीने ऑस्ट्रेलियात खेळलेल्या 12 मॅचमध्ये 6 शतकं केली आहेत. विराटला ऑस्ट्रेलियात 55.39 च्या सरासरीने 1,274 रन करता आले आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या