IND vs AUS : विराटने मोडला पतौडींचा 51 वर्ष जुना विक्रम, धोनीलाही मागे टाकलं

IND vs AUS : विराटने मोडला पतौडींचा 51 वर्ष जुना विक्रम, धोनीलाही मागे टाकलं

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या चार टेस्ट मॅचच्या बॉर्डर-गावसकर (Border Gavaskar Trophy) ला सुरुवात झाली आहे. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने मन्सूर अली खान पतौडी (Mansoor Ali Khan Pataudi) यांचा विक्रम मोडला आहे.

  • Share this:

ऍडलेड, 18 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या चार टेस्ट मॅचच्या बॉर्डर-गावसकर (Border Gavaskar Trophy) ला सुरुवात झाली आहे. सीरिजची पहिली टेस्ट ऍडलडमध्ये डे-नाईट खेळवली जात आहे. गुलाबी बॉलने होत असलेल्या या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने मन्सूर अली खान पतौडी (Mansoor Ali Khan Pataudi) यांचा विक्रम मोडला आहे. कोरोनामुळे बराच काळ टेस्ट क्रिकेटपासून लांब राहिलेल्या विराटने शानदार पुनरागमन केलं, त्याने 74 रनची खेळी केली.

विराट कोहलीने एमएस धोनी (MS Dhoni) ला मागे टाकत पतौडी यांचं रेकॉर्ड मोडलं आहे. 32 वर्षांच्या विराट कोहलीने या मॅचमध्ये शानदार अर्धशतक केलं, पण त्याला शतक करता आलं नाही. 2020 या वर्षात विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक करता आलं नाही.

विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्टमध्ये सर्वाधिक रन करणारा भारतीय कर्णधार बनला आहे. विराटच्या नावावर कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 851 रन झाल्या आहेत. पतौडी यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधार असताना 10 मॅचमध्ये 829 रन केले होते. याचसोबत विराटने एमएस धोनीच्या 813 रननाही मागे टाकलं आहे.

ऍडलेड टेस्टमध्ये विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताची सुरुवात खराब झाली. ओपनर पृथ्वी शॉ एकही रन न करता दुसऱ्याच बॉलला आऊट झाला. तर मयंक अगरवाल 17 रन करून माघारी परतला. यानंतर विराटने पुजारासोबत आणि मग रहाणेसोबत महत्त्वाच्या पार्टनरशीप केल्या, पण शतकाच्या जवळ जात असतानाच विराट रन आऊट झाला.

अजिंक्य रहाणेने विराटला एक रनसाठी बोलावलं, पण मध्येच रहाणे मागे हटला, या गोंधळात विराट रन आऊट झाला. दुसरा नवीन बॉल यायच्या काही वेळ आधीच विराट माघारी परतला. टेस्ट क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा विराट रन आऊट झाला आहे. याआधीही 2012 साली ऍडलेडच्या मैदानातच विराटला रन आऊट होऊन परतावं लागलं होतं.

Published by: Shreyas
First published: December 18, 2020, 11:32 AM IST
Tags:

ताज्या बातम्या