IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का?, दुखापतीमुळे हुकमी एक्का सराव सोडून गेला

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का?, दुखापतीमुळे हुकमी एक्का सराव सोडून गेला

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला उद्यापासून सुरूवात होणार आहे. पण या मॅचआधीच ऑस्ट्रेलियाच्या टीमला दुखापतींचं ग्रहण लागलं आहे.

  • Share this:

ऍडलेड, 16 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला उद्यापासून सुरूवात होणार आहे. ऍडलेडच्या मैदानात होणारा हा सामना डे-नाईट असल्यामुळे गुलाबी बॉलने खेळवण्यात येणार आहे. पण या मॅचआधीच ऑस्ट्रेलियाच्या टीमला दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार बॅट्समन स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) मंगळवारी फक्त 10 मिनीटं सराव करून निघून गेला. कंबरेला सूज आल्यामुळे स्मिथने सरावात भाग घेतला नाही.

स्टीव्ह स्मिथने जवळपास 10 मिनीटं सहकारी खेळाडूंसोबत सराव केला, यानंतर तो ड्रेसिंग रूममध्ये निघून गेला. बॉल उचलताना स्मिथची कंबर दुखायला लागली. स्मिथसोबत टीमचे फिजियो डेव्हिड बिक्लेही गेले. बुधवारपर्यंत स्मिथ मैदानात उतरू शकणार नाही, त्यामुळे पहिल्या टेस्टमध्ये त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे.

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना दुखापत

भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमला दुखापतींनी ग्रासलं आहे. जर स्मिथला पहिली टेस्ट खेळता आली नाही, तर तो ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का असेल. कारण डेव्हिड वॉर्नरही दुखापतीमुळे पहिल्या टेस्टमधून बाहेर आहे. तर दुसरा ओपनर पुकोवस्की याला सराव सामन्यात डोक्याला बॉल लागला. ऑलराऊंडर कॅमरून ग्रीनही डोक्याला बॉल लागल्यामुळे खेळणार का नाही, याबाबत साशंकता आहे. भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये स्मिथ जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने लागोपाठ दोन मॅचमध्ये शतकं केली होती.

टी-20 सीरिजमध्येही स्मिथने त्याची लय कायम ठेवली होती आणि आता त्याची नजर टेस्ट सीरिजमध्ये मोठा स्कोअर करण्यावर आहे, पण त्याआधी स्मिथला फिट व्हावं लागणार आहे.

Published by: Shreyas
First published: December 16, 2020, 10:03 AM IST
Tags:

ताज्या बातम्या