Home /News /sport /

IND vs AUS : यापेक्षा मुंबई, विदर्भाची टीम बरी, चाहत्यांची टीम इंडियाच्या कामगिरीवर सडकून टीका

IND vs AUS : यापेक्षा मुंबई, विदर्भाची टीम बरी, चाहत्यांची टीम इंडियाच्या कामगिरीवर सडकून टीका

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा (India vs Australia) लाजीरवाणा पराभव झाला. पहिल्या इनिंगमध्ये 53 रनची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा डाव अवघ्या 36 रनवर संपुष्टात आला.

    ऍडलेड, 19 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा (India vs Australia) लाजीरवाणा पराभव झाला. पहिल्या इनिंगमध्ये 53 रनची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा डाव अवघ्या 36 रनवर संपुष्टात आला. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा सगळ्यात कमी स्कोअर होता. याआधी 1974 साली इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स टेस्टमध्ये भारताचा 42 रनवर ऑल आऊट झाला होता. पहिल्या टेस्टमधल्या या पराभवानंतर 'न्यूज-18 लोकमत'ने फेसबूक पेजवरून क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाच्या या कामगिरीवर प्रतिक्रिया विचारली होती. यानंतर क्रिकेट रसिकांनी टीम इंडियाच्या या कामगिरीवर सडकून टीका केली आहे. निवडक प्रतिक्रिया विदर्भ रणजी संघाने यांच्यापेक्षा खरंच सरस कामगिरी केली असती...- दीपक उघडे एकतर इंडिया A टीमला किंवा रणजी मधील मुंबई टीमला पुढच्या मॅच साठी उतरवा. हे निदान अशी भारताबाहेर जाऊन लाज तरी काढणार नाहीत.- कुणाल जाधव यांच्या पेक्षा रणजी विजेती विदर्भ टीम उत्तम खेळते. यांचे पैसे कमी करा आणि जशी कामगिरी तसा मोबदला हे सूत्र ठरवा,मग बघा कसे खेळतात- प्रशांत यादव सर्व नवीन खेळाडू काहीच कामाचे नाहीत, त्यांना घरी बसवा आणि IPL पण खेळू देऊ नका ..पाहिले त्या पृथ्वी ला घरी पाठवा- सचिन कांबळे विराटला कॅप्टन म्हणून काढून एक खेळाडू म्हणून खेळावलं पाहिजे. रोहित ला कॅप्टन बनवलं पाहिजे, कारण धोनी सारखं कर्णधार व्हायला खूप वेळ लागेल- स्वामी गायकर लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, रोहित शर्मा, शिखर धवन यासारख्या अनुभवी प्रतिभावान खेळाडूंना टेस्ट मध्ये संधी द्यावी, एकटा विराट कोहली काय करणार? पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, हनुमा विहारी यांचा रोल तरी काय आहे टेस्ट मध्ये? मागेही न्यूझीलंड विरूद्ध हे पूर्णपणे अपयशी ठरले होते. निवड समितीने लवकरात लवकर टीम बदलावी आणि प्रतिभावान खेळाडूंना संधी द्यावी- गिरीश चौधरी 130 कोटी लोकसंख्येच्या देशातून हे 11 निवडले जातात, यांनी काय दिवे लावले? 36 रन गल्लीतली पोर बरी खेळतात- एसके अर्शद टेस्ट T20 समजून खेळले तर जास्त स्कोर केला असता- प्रविण कोल्हे अप्रतिम गोलंदाजी आनी भारताची सालाबादप्रमाणे पत्त्यासारखी कोसळणारी फलंदाजी....बाकी काही नाही- सतिश कोकाटे आपल्या खेडे गावातील टीम या पेक्षा सरस खेळतील- ओंकार डोंगरे
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या