IND vs AUS : पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी, गावसकरांची टीका खरी ठरली

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण भारताचा ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पुन्हा अपयशी ठरला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण भारताचा ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पुन्हा अपयशी ठरला.

  • Share this:
    ऍडलेड, 17 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला ऍडलेडमध्ये सुरूवात झाली आहे. या मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण भारताचा ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पुन्हा अपयशी ठरला. मॅचच्या दुसऱ्याच बॉलला शॉ शून्य रनवर आऊट झाला. मिचेल स्टार्कने इनस्विंग टाकून शॉला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. पृथ्वी शॉने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली, तसंच तो भारताचं भविष्य असल्याचं सांगितलं जातं, पण मागच्या काही काळापासून तो वारंवार अपयशी ठरत आहे. पृथ्वी शॉच्या बॅटिंगचं तंत्र याला जबाबदार असल्याचं अनेक तज्ज्ञ सांगतात. टेस्ट मॅचमध्ये ओपनिंग करणं हे सगळ्यात कठीण काम मानलं जातं. त्यातच बॉल नवीन आणि स्विंग होणारा असेल, तसंच खेळपट्टी ऑस्ट्रेलियाची असेल, तर मात्र हे आव्हान आणखी खडतर होतं. पहिल्या टेस्टमध्येही पृथ्वी शॉ इनस्विंग बॉल खेळताना बोल्ड झाला. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही शॉकडे बचावात्मक खेळ नसल्याचं सांगितलं होतं. ऍडलेड टेस्ट सुरू व्हायच्या आधी सुनिल गावसकर यांनी टीममध्ये पृथ्वी शॉ याला संधी दिली नव्हती. गावसकर यांनी त्याच्या मानसिकतेवरच प्रश्न उपस्थित केले होते. आयपीएलदरम्यान पृथ्वी शॉने अनेक खराब शॉट मारले, ज्यामुळे गावसकर नाराज झाले होते. मागच्या काही काळापासून शॉ फॉर्ममध्ये नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये पृथ्वी शॉ याने 24.50 च्या सरासरीने 98 रन केले होते. तर वनडे सीरिजमध्ये त्याने 3 मॅचमध्ये 84 रन केले होते. यानंतर आयपीएलमध्येही त्याने 13 मॅचमध्ये 17.53 च्या सरासरीने 228 रन केले. या खराब कामगिरीनंतरही पृथ्वी शॉ याला ऑस्ट्रेलियात दौऱ्यात संधी मिळाली, यातही तो अपयशी ठरला.
    Published by:Shreyas
    First published: