IND vs AUS : विराटला आऊट करण्यासाठी ऑस्ट्रेलियाची रणनीती तयार!

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला 17 डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहली (Virat Kohli) ला आऊट करण्यासाठी ऑस्ट्रेलिया खास रणनीती घेऊन मैदानात उतरणार आहे, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅन्गर (Justin Langer) यांनी दिली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला 17 डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहली (Virat Kohli) ला आऊट करण्यासाठी ऑस्ट्रेलिया खास रणनीती घेऊन मैदानात उतरणार आहे, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅन्गर (Justin Langer) यांनी दिली आहे.

  • Share this:
    ऍडलेड, 15 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला 17 डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहली (Virat Kohli) ला आऊट करण्यासाठी ऑस्ट्रेलिया खास रणनीती घेऊन मैदानात उतरणार आहे, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅन्गर (Justin Langer) यांनी दिली आहे. चार टेस्ट मॅचच्या या सीरिजची पहिली टेस्ट झाल्यानंतर विराट भारतात परतणार आहे. जानेवारी महिन्यात विराटची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) बाळाला जन्म देणार आहे, त्यामुळे विराटने पितृत्वाची रजा मागितली होती. विराटची ही रजा बीसीसीआयने मंजूर केली. विराटच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) टीमचं नेतृत्व करेल. मॅचआधी झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलताना जस्टिन लॅन्गर म्हणाले, 'विराट महान खेळाडू आहे, तेवढाच तो शानदार कर्णधार आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो, पण त्याला आऊट करण्यासाठी खास रणनीती बनवावी लागेल. कर्णधार आणि खेळाडू म्हणून तो किती महत्त्वाचा आहे, ते आम्हाला माहिती आहे.' 'रणनीतीची अंमलबजावणी करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्याला रन करण्यापासून रोखावं लागेल. आतापर्यंत आम्ही त्याला खूप वेळा बघितलं आहे आणि त्यानेही. आम्ही तंत्रावरच भर देऊ जबरदस्ती विराटला भडकवण्याचा प्रयत्न करणार नाही, त्याऐवजी विराटची विकेट घेण्याचे पर्याय शोधू,' असं वक्तव्य लॅन्गरनी केलं. 'आम्ही विराटला आऊट करण्याचा प्रयत्न करू. तो एवढा चांगला खेळाडू आहे, आम्ही त्याचं स्लेजिंग करणार नाही. आम्ही कौशल्यावर खेळतो, भावनेवर नाही. आम्हाला भावनेवर ताबा ठेवावा लागेल,' अशी प्रतिक्रिया लॅन्गरनी दिली. ऑस्ट्रेलियाने भारतापेक्षा जास्त गुलाबी बॉलने टेस्ट खेळल्या आहेत, पण यामुळे ऑस्ट्रेलियाला फायदा मिळेल, असं लॅन्गर यांना वाटत नाही. सर्वोत्कृष्ट टीमचे खेळाडू परिस्थितीनुसार त्यांचा खेळ बदलतात. मॅच कितीही मोठी असो आणि बॉलचा रंग कोणताही असो. आम्ही एक वर्षापासून टेस्ट क्रिकेट खेळलेलो नाही, त्यामुळे मागची कामगिरी महत्त्वाची ठरेल, असं मला वाटत नाही, असं लॅन्गर म्हणाले. याआधी भारताने 2018-19 साली ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात जमिनीवर टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने पराभूत केलं होतं. या पराभवाचा बदला घेण्याची भावना आमच्या मनात नाही, असं लॅन्गर यांनी सांगितलं. 'बदला हा शब्द योग्य नाही. आयपीएलमुळे खेळाडू एकमेकांना चांगले ओळखू लागले आहेत. दोन्ही टीमच्या खेळाडूंमध्ये चांगली मैत्री झाली आहे. मर्यादित ओव्हरची सीरिजही चांगल्या वातावरणात खेळली गेली. भविष्यातही अशाचप्रकारे खेळ होईल, अशी अपेक्षा आहे,' असं लॅन्गर यांना वाटतं.
    Published by:Shreyas
    First published: