मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : जडेजाच्या कनकशनचा वाद, ड्रेसिंग रूममध्ये नेमकं काय झालं? पाहा Inside Story

IND vs AUS : जडेजाच्या कनकशनचा वाद, ड्रेसिंग रूममध्ये नेमकं काय झालं? पाहा Inside Story

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) पहिल्या टी-20 मध्ये रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja)च्या डोक्याला बॉल लागला, यानंतर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) जडेजाचा कनकशन सबस्टिट्युट म्हणून मैदानात आला.

    सिडनी, 7 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja)च्या डोक्याला बॉल लागला, यानंतर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) जडेजाचा कनकशन सबस्टिट्युट म्हणून मैदानात आला. पण जडेजाऐवजी चहलला सबस्टिट्युट म्हणून खेळवल्यामुळे वाद निर्माण झाला होता. ऑस्ट्रेलियानेही याला आक्षेप घेतला होता. कनकशन सबस्टिट्युटच्या नियमानुसार खेळाडूला दुखापत झाल्यानंतर त्याच्यासारखाच दुसरा खेळाडू सबस्टिट्युट म्हणून खेळू शकतो. म्हणजेच बॉलरला दुखापत झाली तर बॉलर आणि बॅट्समनला दुखापत झाली तर बॅट्समन कनकशन सबस्टिट्युट म्हणून मैदानात येऊ शकतो. ड्रेसिंग रूममध्ये नेमकं काय झालं? क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार रविंद्र जडेजाला ड्रेसिंग रूममध्ये चक्कर यायला लागली, त्यामुळे चहलला मैदानात पाठवावं लागलं. स्टार्कने टाकलेला बॉल जडेजाच्या हेल्मेटला लागल्यानंतर तो क्रिजवर नीट वावरत नव्हता, असं डगआऊटमध्ये बसलेल्या संजू सॅमसनला जाणवलं. याबाबत संजू सॅमसनने मयंक अगरवालला सांगितलं. यानंतर मयंकने टीमला याबाबतची माहिती दिली. टीमला याबाबतची माहिती मिळाली तोपर्यंत 20 ओव्हर संपल्या होत्या. इनिंग संपल्यानंतर जडेजा ड्रेसिंग रूममध्ये जात होता, तेव्हा दोन खेळाडू त्याला घेऊन गेले. आपल्याला चक्कर येत असल्याचं त्याने सांगितलं, म्हणून चहलला कनकशन सबस्टिट्युट म्हणून खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये बॅटिंग करताना 20 व्या ओव्हरमध्ये जडेजाला दुखापत झाली. यानंतरही जडेजा बॅटिंग करत होता. जडेजाने त्या मॅचमध्ये नाबाद 44 रन केले. कनकशन सबस्टिट्युट म्हणून मैदानात आलेल्या युझवेंद्र चहलने 3 विकेट घेतल्या, त्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅचही देण्यात आलं. कनकशन सबस्टिट्युट असतानाही मॅन ऑफ द मॅच मिळालेला चहल क्रिकेट इतिहासातला पहिला खेळाडू ठरला. दुसरीकडे दुखापतीमुळे जडेजा उरलेल्या दोन्ही टी-20 मॅचना मुकणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या