IND vs AUS : जडेजाच्या कनकशन सबस्टिट्युटवर ऑस्ट्रेलियन खेळाडूची टीका

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टी-20 मॅचवेळी युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचा कनकशन सबस्टिट्युट म्हणून मैदानात उतरला, पण यावरुन आता वाद निर्माण झाला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टी-20 मॅचवेळी युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचा कनकशन सबस्टिट्युट म्हणून मैदानात उतरला, पण यावरुन आता वाद निर्माण झाला आहे.

  • Share this:
    कॅनबेरा, 5 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे मॅचच्या सीरिजमध्ये 2-1 ने पराभव झाल्यानंतर भारताने (India vs Australia) टी-20 सीरिजची सुरुवात चांगली केली. विराट कोहली (Virat Kohli) च्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिली टी-20 11 रनने जिंकली. केएल राहुलने मॅचमध्ये अर्धशतक केलं, तर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने फटकेबाजी करत 44 रन केले. युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) तीन विकेट घेत मॅन ऑफ द मॅच ठरला. चहल हा जडेजाचा कनकशन सबस्टिट्युट म्हणून मैदानात आला होता. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना जडेजाच्या डोक्याला बॉल लागला होता, पण जडेजाचा कनकशन सबस्टिट्युट म्हणून युझवेंद्र चहल म्हणून मैदानात आल्यामुळे नवा वाद निर्माण झाला. ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टिन लॅन्गर यांनीही यावरुन मॅच रेफ्री डेव्हिड बून यांच्याशी वाद घातला. कनकशन सबस्टिट्युट म्हणून आलेल्या युझवेंद्र चहलने या मॅचमध्ये 3 विकेट घेऊन 30 रन दिल्या. ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मोईसेस हेनरिक्स याने टीम इंडियाच्या या कनकशनवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 'कनकशनचा निर्णय घेण्यात आला, याबाबत आम्हाला काहीही अडचण नाही, पण यातला पर्यायी खेळाडूही त्याच्यासारखाच असायला हवा. जडेजा ऑलराऊंडर आहे, त्याने बॅटिंग केली होती आणि चहल एक बॉलर आहे,' असं हेनरिक्स मॅच संपल्यानंतर म्हणाला. दरम्यान दुखापतीमुळे रविंद्र जडेजा टी-20 सीरिजला मुकणार आहे. जडेजाच्या तब्येतीबाबत कर्णधार विराट कोहलीने माहिती दिली. डोक्याला बॉल लागल्यानंतर जडेजाला चक्कर आल्याचं कोहली म्हणाला. भारताच्या बॅटिंगवेळी 20 व्या ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कने टाकलेला बॉल जडेजाच्या हेल्मेटला लागला. यानंतरही जडेजा बॅटिंग करत राहिला. मिचेल स्टार्कच्या चौथ्या आणि पाचव्या बॉलवर जडेजाने दोन फोर मारले. या खेळीमध्ये जडेजाने 44 रन केले.
    Published by:Shreyas
    First published: