Home /News /sport /

IND vs AUS : पहिल्या टी-20 साठी टीममध्ये नसतानाही चहल मॅन ऑफ द मॅच

IND vs AUS : पहिल्या टी-20 साठी टीममध्ये नसतानाही चहल मॅन ऑफ द मॅच

वनडे सीरिजमधल्या पराभवानंतर भारतीय टीमने ऑस्ट्रेलिया (India vs Australia) विरुद्धच्या टी-20 सीरिजची सुरुवात चांगली केली आहे. टीममध्ये नसलेला युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) भारताच्या विजयाचा हिरो ठरला

    कॅनबेरा, 4 डिसेंबर : वनडे सीरिजमधल्या पराभवानंतर भारतीय टीमने ऑस्ट्रेलिया (India vs Australia) विरुद्धच्या टी-20 सीरिजची सुरुवात चांगली केली आहे. शुक्रवारी झालेल्या पहिल्या टी-20 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 11 रनने पराभव केला. टीममध्ये नसलेला युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) भारताच्या विजयाचा हिरो ठरला, यासाठी त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ऐवजी कनकशन सबस्टिट्युट म्हणून मैदानात आलेल्या चहलने तीन विकेट घेतल्या. चहलने त्याच्या 4 ओव्हरमध्ये फक्त 25 रन दिल्या. ऑस्ट्रेलियाने कॅनबेरामध्ये झालेल्या पहिल्या टी-20 मध्ये टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताची सुरुवात खराब झाली. ओपनर शिखर धवन 1 रनवर तर विराट कोहली 9 रनवर आऊट झाले. यानंतर केएल राहुल 51 रन, रविंद्र जडेजा 44 रन आणि संजू सॅमसनच्या 23 रनमुळे भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 161 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 7 ओव्हरमध्ये 150 रनच करता आले. जडेजाऐवजी मैदानात उतरला चहल बॅटिंग करत असताना 20 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर जडेजाच्या हेल्मेटला बॉल लागला, त्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली. यानंतरही जडेजा बॅटिंग करत राहिला. स्टार्कच्या ओव्हरच्या चौथ्या आणि पाचव्या बॉलवर त्याने फोर मारगेल. भारताची इनिंग संपल्यानंतर मेडिकल टीमने जडेजाच्या दुखापतीचं परिक्षण केलं आणि त्याला पुढे न खेळण्याचा सल्ला दिला. यानंतर भारताने जडेजाऐवजी चहलला कनकशन सबस्टिट्युट म्हणून मैदानात उतरवलं. अखेर चहलच भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. भारताने या मॅचमध्ये विराट कोहली, केएल राहुल, शिखर धवन, मनिष पांडे, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, मोहम्मद शमी आणि टी नटराजन यांना संधी दिली होती.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या