सिडनी, 26 नोव्हेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या दौऱ्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. शुक्रवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर दोन्ही टीममध्ये पहिली वनडे खेळवली जाईल. कोरोना व्हायरसनंतर नऊ महिन्यांनी भारतीय टीम आंतरराष्ट्रीय मॅच खेळणार आहे. एवढ्या महिन्यानंतर भारतीय टीमला मैदानात पाहताना चाहत्यांना आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यालाही नव्या सुरुवातीची चांगली अपेक्षा असेल, त्यामुळे विराट मजबूत टीम घेऊन मैदानात उतरेल.
पहिल्या वनडेमध्ये भारतीय टीम पाच बॅट्समनना घेऊन खेळू शकते. ओपनिंगला शिखर धवन, मयंक अग्रवाल यांचं खेळणं निश्चित मानलं जात आहे. तर विराट तिसऱ्या आणि श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर दिसतील. पाचव्या क्रमांकावर केएल राहुल बॅटिंग करेल. राहुलकडेच विकेट कीपिंगची जबाबदारी असेल. राहुलने न्यूझीलंडमध्ये वनडे आणि टी-20 सीरिजमध्ये बॅट्समन आणि विकेट कीपर म्हणून चांगली कामगिरी केली होती.
टीममध्ये दोन ऑलराऊंडर
टीम इंडिया पहिल्या मॅचसाठी दोन ऑलराऊंडरना संधी देऊ शकते, त्यामुळे हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा हे दोघंही खेळताना दिसू शकतात. आयपीएल (IPL 2020) आधीपासूनच जडेजा चांगल्या फॉर्ममध्ये आहे, पण हार्दिक बॉलिंग टाकण्यासाठी फिट आहे का नाही, याचं उत्तर शुक्रवारीच मिळेल. आयपीएलमध्ये मुंबई (Mumbai Indians) कडून खेळताना हार्दिकने एकदाही बॉलिंग केली नव्हती.
टीम इंडियाची बॉलिंग
पाच बॅट्समन आणि दोन ऑलराऊंडरना टीममध्ये ठेवण्याचा निर्णय कोहलीने घेतला तर चार बॉलर खेळू शकतील. यामध्ये जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल आणि मोहम्मद शमी यांचं स्थान पक्क आहे. तर चौथ्या बॉलरची निवड सिडनीची खेळपट्टी बघून घेतला जाऊ शकतो. खेळपट्टी जलद असेल तर नवदीप सैनीला खेळवलं जाईल. नवदीप सैनीची जलद बॉलिंग टीम इंडियासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतं.
भारताची संभाव्य टीम
शिखर धवन, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी
हे खेळाडू बाहेर?
शुभमन गिल, संजू सॅमसन, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मनीष पांडे