सिडनी, 28 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडिया (India vs Australia) चा 66 रनने पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. आयसीसीने टीम इंडियाच्या खेळाडूंवर कारवाई केली आहे. सिडनी वनडेमध्ये निर्धारित वेळेमध्ये 50 ओव्हर पूर्ण न केल्यामुळे खेळाडूंच्या मानधनाची 20 टक्के रक्कम कापण्यात आली आहे. पहिल्या वनडेमध्ये भारतीय बॉलरना 50 ओव्हर पूर्ण करायला चार तास सहा मिनिटं लागली.
आयसीसीचे मॅच रेफ्पी डेव्हिड बून यांनी ही कारवाई केली आहे. कर्णधार विराट कोहलीने टीमने केलेलं नियमांचं उल्लंघन आणि प्रस्तावित दंड स्वीकार केला आहे. विराटने याचा स्वीकार केल्यामुळे अधिकृत सुनावणीची गरज पडली नाही. मैदानातले अंपायर रॉड टकर, सॅम नोगाजस्की, टीव्ही अंपायर पॉल रायफल आणि चौथे अंपायर गेरार्ड एबोड यांनी हा दंड लावला. मी खेळलेली ही 50 ओव्हरची सगळ्यात जास्त चाललेली मॅच असल्याचं स्टीव्ह स्मिथ मॅच संपल्यानंतर म्हणाला.
पहिल्या वनडेमध्ये भारतीय बॉलरनी निराशाजनक कामगिरी केली. पाच बॉलरसह भारतीय टीम मैदानात उतरली होती, यापैकी दोन स्पिनर होते, तरीही त्यांना 50 ओव्हर पूर्ण करायला 4 तासांपेक्षा जास्त वेळ लागला. कोरोना व्हायरसनंतर टीम इंडिया पहिल्यांदाच वनडे क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरली होती. आता रविवारी होणाऱ्या मॅचमध्ये खेळाडूंना ओव्हर रेटवर लक्ष द्यावं लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.