Home /News /sport /

IND vs AUS : Hotstar ला नाही दिसणार वनडे मॅच; Live Streaming कुठे पाहायचं?

IND vs AUS : Hotstar ला नाही दिसणार वनडे मॅच; Live Streaming कुठे पाहायचं?

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या दौऱ्याला उद्यापासून सुरूवात होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.

    सिडनी, 26 नोव्हेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या दौऱ्याला उद्यापासून सुरूवात होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. वनडे सीरिजपासून हा दौरा सुरू होणार आहे. पहिली वनडे सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होईल. वनडे सीरिज संपल्यानंतर टी-20 आणि मग 17 डिसेंबरपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळवली जाईल. विराट कोहली (Virat Kohli)च्या टीमने शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच मार्चच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध खेळली होती. कोरोना व्हायरसमुळे भारतीय टीमने गेल्या 9 महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेलं नाही. आता ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याचं विराटच्या टीमला आव्हान असणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडिया मैदानात उतरत आहे, त्यामुळे त्याची कमी विराटला नक्कीच जाणवेल. दुखापत झालेल्या रोहितच्या गैरहजेरीचा परिणाम भारताच्या बॅटिंगवर नक्कीच होईल. भारत-ऑस्ट्रेलिया पहिली मॅच कधी? शुक्रवार 27 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली वनडे खेळवली जाईल. कुठे होणार सामना? या दोन्ही टीममध्ये सिडनी क्रिकेट ग्राऊंड (SCG) वर पहिला सामना खेळवला जाईल. किती वाजता सुरू होणार मॅच? भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली पहिली वनडे भारतीय वेळेनुसार सकाळी 9.10 मिनिटांनी सुरू होईल. कुठे बघता येईल मॅच? भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या मॅचचं प्रसारण, सोनी सिक्स, सोनी टेन 1 आणि सोनी टेन 3 वर होणार आहे. लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार? या मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग सोनी लिव वर पाहता येणार आहे. फ्री प्रसारण कसं पाहाल? भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या मॅचचं फ्री लाईव्ह प्रसारण डीडी स्पोर्ट्स आणि डीडी नॅशनलवर पाहता येईल. फ्री लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल? भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅचचं फ्री लाईव्ह स्ट्रिमिंग एयरटेल पोस्टपेड आणि जियो सबस्क्रायबर एयरटेल स्ट्रीम आणि जियो टीव्हीवर पाहू शकतील.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या