Home /News /sport /

IND vs AUS : सरावावेळी दुखापतग्रस्त झाला टीम इंडियाचा खेळाडू, भारतात परतला

IND vs AUS : सरावावेळी दुखापतग्रस्त झाला टीम इंडियाचा खेळाडू, भारतात परतला

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरूवात (India vs Australia) खराब झाली आहे. पहिल्या दोन वनडेमध्ये विराटच्या टीमचा मोठा पराभव झाला.

    सिडनी, 2 डिसेंबर : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरूवात (India vs Australia) खराब झाली आहे. पहिल्या दोन वनडेमध्ये विराटच्या टीमचा मोठा पराभव झाला. यानंतर आता फास्ट बॉलर इशान पोरेल (Ishan Porel) याला भारतात पाठवण्यात आलं आहे. नेटमध्ये सराव करत असताना इशान पोरेलच्या पायाच्या मांसपेशीना दुखापत झाली, त्यामुळे तो काहीच दिवसांपूर्वी भारतात परतला. इशान पोरेलची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत तो एनसीएमध्ये गेल्यानंतर कळेल, असं बीसीसीआय (BCCI) च्या सूत्रांनी सांगितलं. टी नटराजन, इशान पोरेल आणि कार्तिक त्यागी यांना भारतीय टीम नेट बॉलर म्हणून ऑस्ट्रेलियाला नेण्यात आलं आहे. यापैकी नटराजन याची भारतीय टीममध्ये निवड झाली, तर इशान पोरेल भारतात परतला, त्यामुळे आता ऑस्ट्रेलियात आता कार्तिक त्यागी हा एकमेव नेट बॉलर राहिला आहे. कमलेश नागरकोटी हा देखील ऑस्ट्रेलियाला जाणार होता, पण आयपीएलदरम्यान जास्त क्रिकेट खेळल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाला न पाठवण्याचा निर्णय शेवटच्या क्षणी घेण्यात आला. इशान पोरेल कोण आहे? आयपीएलमध्ये इशान पोरेल पंजाब (KXIP) च्या टीममध्ये आहे, पण यंदाच्या आयपीएल (IPL 2020)मध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि न्यूझीलंड ए दौऱ्यात पोरेलने चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे त्याची टीम इंडियामध्ये नेट बॉलर म्हणून निवड करण्यात आली. त्याआधी 2018 अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये दुखापत झाल्यामुळे इशान पोरेलने मोठी विश्रांती घेतली होती, पण स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने पुनरागमन करत चांगली कामगिरी केली. इशान पोरेलची दुखापत ग्रेड-ए असेल तर त्याला मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळता येणार नाही. इशान पोरेल खेळला नाही तर तो बंगालसाठी मोठा धक्का असेल. बँगलोरच्या एनसीएमध्ये इशान पोरेलवर उपचार करण्यात येतील.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या