सिडनी, 28 नोव्हेंबर : भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडिया (India vs Australia)चा 66 रनने मोठा पराभव झाला.
कर्णधार एरन फिंच, स्टीव्ह स्मिथ यांचं शतक, डेव्हिड वॉर्नरचं अर्धशतक आणि ग्लेन मॅक्सवेलच्या आक्रमक खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने भारताला 375 रनचं आव्हान ठेवलं, पण हे आव्हान भारताला पेललं नाही. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने देखील शानदार अर्धशतकी खेळी केली. वॉर्नरने फक्त सिक्स-फोर मारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले नाही, तर फिल्डिंग करतानादेखील डान्स करून मनोरंजन केलं.
लॉकडाउनच्या काळात डेव्हिड वॉर्नर हिंदी आणि दाक्षिणात्य गाण्यांवर वेगवेगळे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकत होता. या गाण्यांवर डान्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
शुक्रवारी झालेल्या सामन्यात देखील डेव्हिड वॉर्नर याने आपलं दाक्षिणात्या गाण्यांविषयी असलेलं प्रेम दाखवून दिलं. फिल्डिंग करत असताना ‘बुट्टा बोम्मा’ या गाण्यावर डान्स करताना तो दिसून आला. या सामन्यात प्रेक्षकांनादेखील परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे एका प्रेक्षकाने आपल्या कॅमेऱ्यामध्ये हा क्षण कैद केला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाला आहे.
Buttabomma and Warner Never Ending Love Story .#AUSvIND @davidwarner31 pic.twitter.com/TjEeMKzgt3
— M A N I (@Mani_Kumar15) November 27, 2020
शुक्रवारी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात पहिले बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये 374 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानांचा पाठलाग करताना भारतीय टीमला 308 रनच करता आल्या. या सामन्यात भारताच्या सुरुवातीच्या बॅट्समनना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. हार्दिक पंड्या आणि शिखर धवन यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना देखील अपयश आले. हार्दिकने दमदार 90 रन तर धवनने 74 रन केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.